कृषी मंत्रालय

2020-21 दरम्यान भारताच्या कृषी व्यापारात वृद्धी


देशभरात महामारी असताना देखील एप्रिल 2020 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीत कृषी आणि संबंधित वस्तूंच्या निर्यातीत 18.49 टक्के वाढ दिसून आली.

2020-21 मध्ये भारतात गहू निर्यातीमध्ये 727% तर तांदळाच्या (बिगर बासमती) निर्यातीमध्ये 132% वाढ दिसून आली

Posted On: 21 APR 2021 5:18PM by PIB Mumbai

 

गेल्या अनेक वर्षांत भारताने कृषी उत्पादनांमध्ये सातत्याने व्यापार अधिशेष कायम ठेवला आहे. 2019-20 दरम्यान भारताची कृषी आणि संबंधित निर्यात 2.52 लाख कोटी आणि आयात 1.47 लाख कोटी रुपये इतकी होती. महामारीच्या कठीण काळातही, जागतिक अन्न पुरवठा साखळीत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून भारताने निरंतर निर्यात सुरु ठेवली. एप्रिल 2020 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीत 2.74 लाख कोटी रुपयांची कृषी आणि संबंधित वस्तूंची निर्यात झाली. मागील वर्षी हा आकडा 2.31 लाख कोटी रुपये इतका होता. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी यामध्ये 18.49 टक्क्यांची वाढ निदर्शनाला आली आहे.

गहू, इतर कडधान्य, तांदूळ (बासमती व्यतिरिक्त), सोया, मसाले, साखर, कापसाच्या गाठी , ताजा भाजीपाला, प्रक्रिया केलेल्या भाज्या आणि अल्कोहोलिक पेये इत्यादीच्या निर्यातीत सकारात्मक वाढ झाली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत गहू आणि इतर कडधान्यांमध्ये अनुक्रमे 425 कोटी रुपये ते 3283 कोटी रुपये आणि 1318 कोटी रुपये ते 4542 कोटी रुपये इतक्या मोठ्या प्रमाणात वृद्धी झाली आहे.विविध   देशांकडून होणाऱ्या विशिष्ट मागणीनुसार, नाफेडने जी2जी अंतर्गत अफगाणिस्तानाला 50,000 मेट्रिक टन आणि लेबनॉनला 40,000 मेट्रिक टन गहू निर्यात केला आहे. भारताच्या  गहू निर्यातीसाठी  727 टक्के वाढ झाली आहे.

तांदळाच्या (बिगर बासमती) निर्यातीत देशात 132 टक्क्यांनी वाढ झाली आहे. वर्ष 2019-20 या वर्षात 13,030 कोटी रुपये इतकी बिगर-बासमती तांदळाची निर्यात झाली होती वर्ष 2020-21 मध्ये यात वाढ होऊन ही निर्यात 30,277 कोटी रुपयांवर गेली आहे. अनेक कारणांमुळे निर्यातीत ही वाढ झाली आहे, मुख्यतः भारताला  पापुआ न्यू गिनी, ब्राझील, चिली आणि पोर्तोरिको या नवीन बाजारपेठांचा ताबा मिळाला आहे. टोंगो, सेनेगल, मलेशिया, मेडागास्कर, इराक, बांगलादेश, मोझांबिक, व्हिएतनाम, टांझानिया रिपब्लिक मादागास्कर या देशामध्ये देखील निर्यात करण्यात आली.

भारताच्या सोयाबीनच्या निर्यातीतही 132% वाढ झाली. 2019-20 मधील 3,087 कोटी रुपयांच्या तुलनेत  वाढ होऊन 2020-21 मध्ये ही निर्यात 7,224 कोटींवर गेली आहे.

वर्ष 2019-20 च्या तुलनेत एप्रिल 2020 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीत निर्यातीत लक्षणीय वाढ नोंदविणाऱ्या कृषी आणि संबंधित अन्य वस्तूंमध्ये मसाले (23,562 कोटी रुपयांच्या तुलनेत 26,257 कोटी रुपये; वाढ 11.44%), साखर (12,226 कोटी रुपयांच्या तुलनेत रुपये 17,072 कोटी रुपये; वाढ 39.64%), कच्चा कापूस (6771 कोटी रुपयांच्या तुलनेत 11373 कोटी रुपये; वाढ 67.96%), ताजा भाजीपाला (4,067 कोटी रुपयांच्या तुलनेत 4,780 कोटी रुपये; वाढ 17.54%) आणि प्रक्रिया केलेला  भाजीपाला (1994 कोटी रुपयांच्या तुलनेत 2846 कोटी रुपये; वाढ42.69%) इत्यादींचा समावेश आहे.

एप्रिल 2020 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीत 1,41,034.25 कोटी रुपयांच्या कृषी आणि संबंधित वस्तूंची आयात केली मागील वर्षी याच कालावधीत 1,37,014.39 कोटी रुपयांची आयात केली होती यावर्षी यामध्ये 2.93 टक्क्यांची वाढ निदर्शनाला आली आहे.

देशभरात कोविड-19 ची परिस्थिती असताना देखील कृषी व्यापाराच्या क्षेत्रात समतोल  वाढ झाली आहे. वर्ष 2019-20 कालावधीतील 93,907.76 कोटी रुपयांच्या तुलनेत एप्रिल 2020 ते फेब्रुवारी 2021 या कालवधीत वाढ होऊन 1,32,579.69 कोटी रुपये इतकी झाली आहे.

कृषी निर्यात डेटासाठी येथे क्लिक करा

कृषी आयात डेटासाठी येथे क्लिक करा

***

Jaydevi PS/S.Mhatre/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1713280) Visitor Counter : 1129