आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

केन्द्रीय आरोग्य मंत्रालयाने जागतिक यकृत दिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अश्वीनीकुमार चौबे यांनी भूषवले


मौसमी खाद्य पदार्थ आणि मिताहाराच्या सवयींवर भर द्यावा: मित-भुक्त, रित भुक्त

यकृत आणि एनसीडीएस आजारांवर मात करण्यासाठी फिट इंडिया मूव्हमेट (आरोग्यपूर्ण भारत अभियान), इट राईट इंडिया ( योग्य आहार) आणि योग यावर लक्ष केंद्रीत करत भारताने स्विकारला अनोखा मार्ग

Posted On: 19 APR 2021 5:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 एप्रिल 2021

 

जागितक यकृत दिवसा निमित्ताने आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षपद केन्द्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री श्री अश्विनीकुमार चौबे यांनी भूषवले.

या दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन, यकृत हा आपल्या शरीरातील दुसरा महत्वाचा अवयव आहे जो अतिशय गुतांगुतीचे कार्य शांतपणे पार पाडत असतो. चुकीच्या जीवनशैलीमुळे या अवयवाला अनेक आघातांना सामोरे जावे लागते. स्वत:ला दुरुस्त करण्यात किंवा त्याचे योग्य पुनर्भरण करण्यात यकृत असमर्थ ठरते तेव्हा त्याचा प्रवास नॉन अल्कोहोलिक फॅटी लिवर डिसिजेस(NAFLD) च्या दिशेने होतो याकडे त्यांनी लक्ष वेधले . एकदा का ही स्थिती उद्भवली की त्यावर उपाय नाही. या पासून मृत्यू किंवा गंभीर स्थिती रोखणे यासाठी महत्वाचे ठरते, आधीच काळजी घेणे आणि आरोग्याबाबत जागृती. आपल्याच आरोग्याबाबत निष्काळजीपणाची भावना सध्याच्या वेगवान जीवनशैलीसाठी जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

NAFLD देशात शांतपणे महामारीसारखे काम करत असल्याचे चौबे म्हणाले. जगभरात एक अब्जाहून अधिक लोक या आजाराने ग्रस्त आहेत (जगातील लोकसंख्येच्या 20-30 % ). भारतात याचा प्रसार 9-32% वाढला आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर दहा भारतीयांपैकी 1 ते 3 जणांना यकृताची सूज किंवा तत्सम आजाराने ग्रासले आहे.

कुठर आघात अर्थात यकृत आघाताने आपले आणि आपल्या माणसांचे आयुष्य उद्धस्त करु नका असे कळकळीचे आवाहन करत धुम्रपान, मद्यपान, अयोग्य आहार करु नये असा सल्ला श्री चौबे यांनी यावेळी दिला. कुटुंबातल्या व्यक्तीच्या घोरण्याच्या प्रमाणाकडे लक्ष द्यावे आणि वैदयकीय सल्ला घ्यावा असेही त्यांनी सांगितले. प्राचीन संस्कृतीतील मित-भुक्त आणि रित भुक्त या संकल्पनेवर त्यांनी भर दिला. यानुसार कमी खाणे आणि ज्या हंगामात जे उगवते ते खाणे दीर्घायुष्यासाठी लाभदायक ठरते असे चौबे म्हणाले.सरकारने या अनुषंगाने उचलेल्या पावलांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

भारत पहिला देश आहे ज्याने NAFLD संदर्भात पावले उचलण्याची निकड ओळखली आणि त्याला राष्ट्रीय कार्यक्रमात स्थान दिले. याअंतर्गत, कर्करोग नियंत्रण, मधूमेह, हृदयविकार, अंतर्गत आघात यांच्या नियंत्रणाचा समावेश आहे. (NPCDCS) हा NCDs साठीचा पथदर्शी राष्ट्रीय कार्यक्रम आहे . जगातल्या असंसर्गजन्य आजारांचा विचार करता भारतातील रुग्णांची संख्या जास्त आहे. पण, चयापचयाबाबतच्या आजाराचे मूळ कारण यकृतात दडलेले आहे. संपूर्ण देशात आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब झाला पाहिजे, यासाठी NAFLD चे परिणाम आणि त्यावर उपचार अशक्य असल्याची जागृती करणे, याकरता संबंधित आजारा संदर्भात खबरदारी, नियंत्रण आणि व्यवस्थापन यांची युद्धपातळीवर अंमलबजावणी करायला हवी असे त्यांनी सांगितले. आतापर्यंत NCD बाबत झालेल्या एकूण चाचणी प्रक्रियचे त्यांनी कौतुक केले. यात AB-HWC कार्यक्रमा अंतर्गत 75,000 पेक्षा जास्त प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या माध्यमातून (CPHC) कार्यक्रम अधिक प्रभावीपणे आणि जनस्नेही पद्धतीने राबवला जाणार आहे. "आशा" कार्यकर्त्यांबरोबरच पुरुष कार्यकर्ते (विश्वास) यांनाही प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे प्राथमिक आरोग्य सेवेचे जाळे विस्तारण्यासाठी आणखी मनुष्यबळ उपलब्ध होईल.

सर्वांसाठी निरामय आरोग्य या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनाचे त्यांनी कौतुक केले. NAFLD मुळे होणारे मृत्यू आणि त्रास रोखायचा असेल तर आरोग्याबाबत जनजागृती, खबरदारीचे उपाय यासह संबंधित घटकांवर भर द्यावा लागेल. यात वजन कमी करणे, आरोग्यदायी जीवनशैली आणि धोका टाळणाऱ्या उपायांचा समावेश आहे. सध्या भारत कम्युनिकेबल आणि नॉन कम्युनिकेबल अशा दुहेरी आजारांचा सामना करतोय. खबरदारीच्या उपायांनी त्यांना रोखता येईल. या संकटावर मात करण्यासाठी, फिट इंडिया मूव्हमेट (आरोग्यपूर्ण भारत अभियान), इट राईट इंडिया ( योग्य आहार) आणि योग यावर लक्ष केंद्रीत करत भारताने अनोखा मार्ग स्विकारला आहे.

सर्वे भवंतु सुखिन:, सर्वे संतु निरामयाय या महान तत्वाचा उद्घोष करत श्री अश्विनीकुमार चौबे यांनी आपल्या भाषणाची सांगता केली. सर्व भारतीयांना निरामया आरोग्य लाभावे हाच सरकारचा प्रयत्न असल्याचे यातून स्पष्ट केले.

डॉ. पूनम खेत्रपाल सिंग, विभागीय संचालक, जागतिक आरोग्य संघटना- दक्षिण पूर्व आशिया क्षेत्रीय कार्यालय सुश्री वंदना गुरनानी, अतिरिक्त सचिव आणि अभियान संचालक एनएचएम, डॉ सुनील कुमार, आरोग्य सेवा महासंचालक, श्री विशाल चौहान, संयुक्त सचिव (नॉन-कम्युनिकेशनल डिजीज), डॉ. एसके सरीन, संचालक , इंस्टिट्यूट ऑफ लिव्हर अँड बायलरी सायन्सेस, या कार्यक्रमास उपस्थित होते.

Jaydevi PS/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1712679) Visitor Counter : 222