संरक्षण मंत्रालय

शौर्य पुरस्कार पोर्टलद्वारे गैलेंट्री अँवार्ड पोर्टलच्या माध्यमातून (ईनोव्हेटीव्ह ट्रीब्युटस टू ब्रेव्हहार्टस ) शूरवीरांना नाविन्यपूर्ण अभिवादन स्पर्धेचे आयोजन


शौर्य पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यासाठी संपूर्ण भारतातील लोकांनी सहभागी होऊन शौर्य पुरस्कार विजेत्यांना वैशिष्ट्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण  पध्दतीने अभिवादन करण्यासाठी प्रशस्तीपत्र पाठवण्याचे आवाहन

Posted On: 18 APR 2021 3:55PM by PIB Mumbai

 

देशातील शौर्य पुरस्कार विजेत्यांचे अमर धैर्य आणि त्याग हा  अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण पध्दतीने राष्ट्राने  स्मरणात ठेवणे स्पृहणीय आहे.  www.gallantryawards.gov.in हे पोर्टल देशातील शौर्य पुरस्कार विजेत्यांचा सन्मान आणि स्मरण  करण्यासाठी तयार आलेले भारताचे अग्रणी ऑनलाईन व्यासपीठ आहे.

गैलेंट्री अँवाॅर्ड पोर्टलने 'ईनोव्हेटीव्ह ट्रीब्युटस टू ब्रेव्ह हार्टस' या स्पर्धेचे आयोजन केले आहे, ज्यात संपूर्ण भारतातून सहभागी होणाऱ्यांना देशातील शूरवीरांना अनुपम  आणि नाविन्यपूर्ण पध्दतीने वंदन करत प्रशस्तीपत्र देण्यासाठी आमंत्रित करण्यात येत आहे.या स्पर्धेचा उद्देश शौर्य पुरस्कार विजेत्यांना सुयोग्य पध्दतीने अभिवादन करण्यासाठी संदेशांची मालिका तयार करणे हा आहे .ही स्पर्धा  दिनांक 15 एप्रिल ते 15 मे  2021पर्यंत सुरू रहाणार आहे.

स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रवेशिकांतील, कलात्मक पैलू, नाविन्य,रचना आणि सरलता पाहून  तसेच त्यातून शौर्य पुरस्कार पोर्टलची दृष्टी आणि उद्दिष्टे किती उत्तमरीतीने  अधोरेखित करण्यात आली आहेत, यानुसार त्यांचे परीक्षण केले जाणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना गैलेंट्री अँवाॅर्ड पोर्टल आणि समाज माध्यमांवरून प्रसिद्धी  देण्यात येईल.तसेच विजेत्यांना  2022 साली  नवीदिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाची कवायत पहाण्याची संधी मिळेल.

कृपया सहभागी होण्यासाठी याला भेट द्यावी.

https://www.gallantryawards.gov.in/single_challenge/event/46   

शौर्य पुरस्कार पोर्टल हे प्रभावशाली,परस्परसंवाद साधण्यास अनुकूल  आणि  सहभागी होण्यासाठी  एक  व्यासपीठ असून नागरीकांमधे स्वदेशाभिमान,निष्ठा  आणि  समर्पण या भावना जागृत करणे हे त्याचे ध्येय आहे. या पोर्टलद्वारे नागरिकांना देशातील सर्वश्रेष्ठ  पराक्रमी  शौर्य पुरस्कार विजेत्यांना आदरांजली वहाण्याची सुलभ संधी मिळते.

 

G.Chippalkatti/S.Patgoankar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1712546) Visitor Counter : 164