रसायन आणि खते मंत्रालय
महाराष्ट्राला रेमडेसिवीरचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करीत आहे: मनसुख मांडवीय
Posted On:
17 APR 2021 6:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 एप्रिल 2021
केंद्र सरकार महाराष्ट्र राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांच्या नियमितपणे संपर्कात आहे आणि रेमडेसिवीरचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करीत आहे, अशी माहिती रसायने आणि खत राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली. यासंदर्भात केंद्र सरकारवर होत असलेल्या आरोपांचे त्यांनी त्यांच्या ट्वीट संदेशांच्या माध्यमातून खंडन केले.
We are doubling the production in the country and have given express permission to more 20 Plants since 12-4-2021 to manufacturers. Ensuring adequate supply of Remdesivir to the people of Maharashtra remains our priority. (2/4)
— Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) April 17, 2021
रेमडेसिवीरचे देशांतर्गत दुप्पट उत्पादन करण्याचे लक्ष्य साध्य करण्याच्या दृष्टीने उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी केंद्र सरकारने 12 एप्रिल 2021 पासून आतापर्यंत आणखी 20 कारखान्यांना परवानगी दिली आहे. महाराष्ट्रातील जनतेला रेमडेसिवीरचा पुरेसा साठा खात्रीशीरपणे उपलब्ध करून देण्याला केंद्र सरकारने नेहमीच प्राधान्य दिले आहे असे मांडवीय म्हणाले.
अधिकृत सरकारी माहितीनुसार, फक्त एक निर्यातक्षम कारखाना आणि विशेष आर्थिक विभागातील एक कारखाना अशा दिन ठिकाणी रेमडेसिवीरचे उत्पादन होत आहे. सरकारने रेमडेसिवीरच्या सर्व उत्पादकांशी संपर्क साधला असून असा कोणताही पाठविलेल्या मालाची अडवणूक झालेली नाही.
नोंद असलेल्या सर्व 16 रेमडेसिवीर उत्पादक कंपन्यांची यादी, त्यांच्याकडील मालाची उपलब्धता आणि त्यांचे WHO-GMP प्रमाणपत्र यांची माहिती सर्वांना कळवावी अशी विनंती मांडवीय यांनी सर्व संबंधितांना केली आहे. देशातील नागरिकांना मदत करण्यासाठी आवश्यक असेल ते सर्व काही करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे असे मांडवीय यांनी म्हटले आहे.
* * *
S.Thakur/S.Chitnis/D.Rane
(Release ID: 1712446)
Visitor Counter : 219