पर्यटन मंत्रालय

आदरातिथ्य आणि पर्यटन उद्योग बळकट करण्यासाठी पर्यटन मंत्रालयाचा ऑनलाईन प्रवास कंपन्यांशी सामंजस्य करार

Posted On: 16 APR 2021 2:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 एप्रिल 2021

विशेषतः महामारीच्या काळात आदरातिथ्य आणि पर्यटन उद्योगाच्या बळकटीकरणासाठी सुरु असेल्या प्रयत्नांनुसार , 15 एप्रिल ,2021 रोजी पर्यटन  मंत्रालयाने क्लिअरट्रीप आणि ईझ माय ट्रीप या कंपन्यांशी सामंजस्य करार (एमओयु) केला.

ओटीए मंचावर साथी  (आदरातिथ्य  उद्योगाचे  मूल्यांकन, जागरूकता आणि प्रशिक्षण यासाठीची प्रणाली) चे  स्व-प्रमाणपत्र असलेल्या निवासगृहांना   व्यापक दृश्यमानता उपलब्ध करून देणे, हा या सामंजस्य कराराचा प्राथमिक उद्देश आहे.

कोविड -19 चा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने ,योग्य संरक्षणासह स्थानिक पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी, कंपन्यांची नीधी (NIDHI ) आणि त्याद्वारे साथी (SAATHI ) वर नोंदणी करण्यासाठी या सामंजस्य करारात दोन्ही  पक्षांसाठी रूपरेषा आखून दिली आहे.

कार्यवाहीची अंतर्दृष्टी तसेच रचनात्मक  पुरावा आधारित आणि लक्ष्यित धोरणात्मक उपाय आणि सुरक्षित, आदरभाव असलेल्या  आणि शाश्वत पर्यटनाला चालना देण्यासाठी निवासगृहांची अधिक माहिती संकलित करणे ही देखील कल्पना आहे.

राकेश कुमार वर्मा , संयुक्त सचिव, पर्यटन मंत्रालय, श्री . बी. बी.  दाश , संचालक ( एच अँड आर) , पर्यटन मंत्रालय , भारतीय गुणवत्ता परिषदेचे ( क्यूसीआय) डॉ. ए राज आणि  मोहित सिंग, विपीन शाह , उपाध्यक्ष , ईझ माय ट्रीप आणि श्रीराम व्ही. , व्यवसाय प्रमुख, क्लिअरट्रीप प्रायव्हेट लिमिटेड यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी समारंभ झाला.

या सामंजस्य कराराच्या माध्यमातून ,पर्यटन क्षेत्राच्या निवडक विभागाच्या  सर्वांगीण फायद्यासाठी पर्यटन मंत्रालय आणि ऑनलाईन प्रवास कंपन्यांनी, धोरणात्मक आणि तांत्रिक सहकार्याला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने आवश्यक पावले उचलण्याचे प्रयत्न करावेत. आदरातिथ्य आणि पर्यटन उद्योगाला बळकटी देण्यासाठी भविष्यात अशाप्रकारच्या  आणखी सामंजस्य करारांवर स्वाक्षरी होईल अशी अपेक्षा आहे.

 

U.Ujgare/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1712223) Visitor Counter : 210