संरक्षण मंत्रालय

भारतीय हवाई दल कमांडर्स परिषद एप्रिल 2021

Posted On: 15 APR 2021 6:00PM by PIB Mumbai

 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज भारतीय हवाई दलाच्या मुख्यालयात द्वैवार्षिक कमांडर्स परिषदेला (एएफसीसी -21) संबोधित केले. 

या परिषदे दरम्यान हवाई दलाचे मार्शल अर्जन सिंग यांची जयंती देखील साजरी केली जात आहे याबद्दल संरक्षण मंत्र्यांनी आपल्या भाषणात आनंद व्यक्त केला. पूर्व लडाखमधील अचानक उद्भवलेल्या घडामोडींना वेळेवर आणि योग्य प्रतिसाद दिल्याबद्दल संरक्षण मंत्र्यांनी  भारतीय हवाई दलाचे  अभिनंदन केले. भविष्यातील धोके लक्षात घेऊन त्यांचा सामना करण्यासाठी क्षमता वाढविण्यासाठी दीर्घकालीन योजना आणि रणनीती तयार करण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

सध्या सुरू असलेल्या कोविड-19 साथीच्या संक्रमणाविषयी बोलताना संरक्षण मंत्र्यांनी इतर सरकारी संस्थांना त्यांच्या कामात मदत करण्यासाठी भारतीय हवाई दलाने निभावलेल्या भूमिकेचे कौतुक केले. बदलत्या आंतरराष्ट्रीय भौगोलिक राजकारणाचा संदर्भ देताना त्यांनी असे नमूद केले की अलिकडच्या काळात ट्रान्स-अटलांटिक पासून ते ट्रान्स-पॅसिफिककडे लक्ष केंद्रीत करण्याकडे असलेले वैचारिक बदल अधिक स्पष्ट झाले आहेत. युद्धाचे परिमाण आता बदलत असून प्रगत तंत्रज्ञान, असमित क्षमता आणि माहिती-वर्चस्व यांचा समावेश यात होत आहे आणि भविष्यातील आयएएफच्या तयारीत या बाबींचा समावेश असणे फार महत्वाचे आहे.

पंतप्रधानांच्या आत्मनिर्भरतेच्याच्या दृष्टीकोनाचा पुनरुच्चार करताना संरक्षण मंत्र्यांनी संरक्षण क्षेत्रात पायाभूत सुविधांमध्ये आत्मनिर्भरतेला प्रोत्साहन देण्याच्या गरजेवर भर दिला. एलसीएसाठी आयएएफने दिलेल्या आदेशामुळे देशांतर्गत संरक्षण उद्योगात भरीव वाढ होईल आणि स्वदेशीकरणाच्या दृष्टीकोनातून यात अमुलाग्र बदल घडून येतील. स्वदेशी संरक्षण उत्पादन आणि विमान देखभाल क्षेत्रात यापेक्षाही अधिक सकारात्मक परिणाम प्राप्त करण्यासाठी त्यांनी कमांडर्सना प्रयत्न सुरू ठेवण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की राष्ट्रीय सुरक्षा आणि आर्थिक विकास या राष्ट्रीय धोरणाच्या पूरक बाबी आहेत. स्वदेशी उद्योगासाठी आयएएफने सहाय्य केल्यामुळे या क्षेत्रात एमएसएमईंचा विकास होईल ज्यामुळे एकाच वेळी देश स्वावलंबी होईल आणि देशाचा सामाजिक-आर्थिक विकास देखील होईल.

कमांडर्स परिषद 16 एप्रिल 2021 रोजी संपन्न होईल.

***

S.Thakur/S.Mhatre/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1712054) Visitor Counter : 238