शिक्षण मंत्रालय

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या 34 व्या दीक्षांत समारंभाला केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी केले संबोधित


आजच्या 34 व्या दीक्षांत समारंभात 2,37,844 पदवी, पदविका आणि प्रमाणपत्र प्रदान केले

Posted On: 15 APR 2021 5:49PM by PIB Mumbai

 

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल 'निशंक' यांनी आज इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या (इग्नू) 34 व्या दीक्षांत समारंभाला आभासी पद्धतीने संबोधित केले. विद्यापीठाने आज 34 व्या दीक्षांत समारंभात  2,37,844 पदवी, पदविका आणि विविध अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान केले. कोविड-19 चा वाढता उद्रेक लक्षात घेत इग्नू मुख्यालयातून आभासी पद्धतीने दीक्षांत समारोह आयोजित केला होता.

34th Convocation of IGNOU. @OfficialIGNOU @EduMinOfIndia @PIB_India @MIB_India @DDNewslive @transformIndia @mygovindia https://t.co/GIRu0mI03s

— Dr. Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) April 15, 2021

यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या स्थापनेपासूनच परवडणारे मुक्त व दूरस्थ पद्धतीच्या माध्यमातून सर्वांना दर्जेदार उच्च शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या भूमिकेचे कौतुक केले. मंत्र्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना स्वावलंबी करणाऱ्या शिक्षण पद्धतीवर भर दिला. स्वावलंबन हे शिक्षण पद्धतीमध्ये विधायक बदल घडवून आणणाऱ्या नवीन शिक्षण धोरणाचे मुख्य आकर्षण आहे. 2035 पर्यंत 50% जीईआर (एकूण नोंदणी प्रमाण) चे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी विद्यापीठाला महत्त्वपूर्ण योगदान द्यावे लागेल, असेही ते म्हणाले.

नवीन शैक्षणिक धोरण, 2020 चा एक महत्त्वाचा भाग असलेल्या चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम (सीबीसीएस) वर प्रकाश टाकताना मंत्री म्हणाले की, विद्यार्थ्यांना यात अभ्यासक्रमांची निवड करण्याची संधी मिळते आणि त्यानंतरही काही कारणास्तव त्यांच्या अभ्यासक्रमात खंड पडला तर तो पूर्ण करण्याची परवानगी दिली जाते.नॅक मध्ये  ए ++ ग्रेड मिळाल्याबद्दल विद्यापीठाचे त्यांनी अभिनंदन केले. या समारंभात आभासी पद्धतीने 29 विद्यार्थ्यांना पदके प्रदान करण्यात आली. दीक्षांत समारंभात वेगवेगळ्या अभ्यासक्रमातील यशस्वी विद्यार्थ्यांना 55 पीएचडी आणि 13 एमफिल पदवी प्रमाणपत्रही प्रदान करण्यात आले.

विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. नागेश्वर राव यांनी आपल्या स्वागतपर भाषणात मंत्री आणि तेथे उपस्थित असलेल्या इतरांना विद्यापीठाचा मागील वर्षातील उपक्रमांविषयी माहिती दिली.

***

Jaydevi PS/S.Mhatre/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1712049) Visitor Counter : 198