विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

डॉ हर्षवर्धन यांनी केली 'आहार क्रांती' अभियानाच्या प्रारंभाची घोषणा

पोषणाविषयी जनजागृती करण्यासाठी 'आहार क्रांती' अभियान

नवा उपक्रम संपूर्ण जगासाठी पथदर्शक ठरेल

Posted On: 14 APR 2021 3:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 एप्रिल 2021

 

पोषणविषयक जनजागृती आणि स्थानिक पातळीवर उपलब्ध पौष्टिक अन्न, फळे आणि भाजीपाला या सर्वांसाठी उपलब्ध व्हाव्यात यासाठी समर्पित “आहाराक्रांती”  या अभियानाचा प्रारंभ केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केला.

Dr Harsh Vardhanannounces launch of `AahaarKranti’.jpg

विज्ञान भारती (विभा), 'ग्लोबल इंडियन सायंटिस्ट्स अँड टेक्नोक्रॅट्स फोरम' (जीआयएसटी), विज्ञान प्रसार, आणि अनिवासी भारतीय शैक्षणिक व वैज्ञानिक संपर्क (प्रभास) यांनी संयुक्तरित्या 'आहार  क्रांती' अभियान  सुरू केले  आहे. 'उत्तम आहार-उत्तम विचार ' हे याचे बोधवाक्य आहे.

भारत आणि जगात इतरत्र भेडसावणारी उपासमारीची समस्या आणि त्या सोबत येणाऱ्या आरोग्याच्या समस्यांवर उपाय म्हणून 'आहारक्रांती’ चळवळ सुरू करण्यात आली आहे.

एका अभ्यासानुसार भारतात जितक्या कॅलरीजचे ग्रहण केले जाते त्यापेक्षा जवळजवळ दुप्पट उत्पादन होते. तरीही, देशातील बरेच लोक अद्याप कुपोषित आहेत. या विसंगतीचे  मूळ कारण पोषणाबाबत जागरुकतेचा अभाव हे आहे.

Image (1).JPG

भारतातील पारंपरिक आहारसमृद्ध आणि पोषणमूल्यांनी परिपूर्ण असून त्याबाबत लोकांमध्ये प्रबोधन करून समस्येवर मात करणे, हे अभियानाचे  उद्दिष्ट आहे. हे स्थानिक पातळीवरील मोसमी फळे आणि भाज्यांमधील पौष्टिक संतुलित आहाराबाबत दृष्टिकोनात नव्याने बदल हे अभियान घडवेल.

विज्ञान भारती (विभा) आणि ‘ग्लोबल इंडियन सायंटिस्ट्स अँड टेक्नोक्रॅट्स’ फोरमने या अभियानासाठी पुढाकार घेतला असून इतर अनेक संस्थादेखील आपली संसाधने आणि कौशल्य यांचे योगदान देण्यासाठी यात सहभागी झाल्या आहेत. केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी आभासी माध्यमातून उपक्रमाचा प्रारंभ केला.

माता अन्‍नपूर्णेच्‍या चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आहारक्रांतीसारखे सामाजिक कल्याणकारी अभियान लोकचळवळ  म्हणून सुरू होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

Image (2).JPG

“देश आज कोविड19  सारख्या साथीच्या संकटाचा सामना करत असताना साथीचा परिणाम कमी करण्याच्या दृष्टीने संतुलित आहार हे एक महत्त्वाचे साधन आहे,'' असे हर्षवर्धन यांनी सांगितले.

Image (3).JPG

या अभियानात  परदेशी भारतीय शास्त्रज्ञ  आघाडीवर असल्याचे त्यांनी कौतुक केले.

या अभियानासाठी आणि त्याला लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या जी.आय.एस.टी.चे प्रफुल्ल कृष्णा, डॉ. येल्लोजीराव मिरजकर, डॉ. श्रीनिवास राव यांचा डॉ. हर्षवर्धन यांनी  खास करून  उल्लेख केला.

देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत  चांगल्या आहाराचा संदेश पोहोचविणे हे आहार क्रांती विकास कार्यक्रमाचे उद्दीष्ट आहे.

यानिमित्ताने विज्ञान प्रसार प्रकाशित 'आहार क्रांती' या  मासिकाचा  (इंग्रजी आणि हिंदी) प्रारंभ करण्यात आला.

 

* * *

Jaydevi PS/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1711773) Visitor Counter : 24