राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपतींकडून डॉ बी.आर.आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा
Posted On:
13 APR 2021 6:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 एप्रिल 2021
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नागरिकांना डॉ भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या संदेशात राष्ट्रपती म्हणतात, “भारतीय घटनेचे शिल्पकार, डॉ भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त, नागरिकांचे मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो.
आपल्या प्रेरणादायी आयुष्यात, डॉ आंबेडकर यांनी अतिशय विपरीत परिस्थितीत अनोखा मार्ग निवडला आणि आपल्या असमान्य आणि बहुविध यशाने त्यांनी लौकिक मिळवला.
ते मानवी अधिकारांचे उत्कट पुरस्कर्ते होते, त्यांनी देशातील वंचित समुदायाच्या सामाजिक-आर्थिक दर्जात वाढ करण्याच्या उद्देशाने आणि शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी ‘बहिष्कृत हितकारिणी सभा’ स्थापन केली. डॉ. आंबेडकर यांनी एक उत्तम आणि न्यायी समाजाची कल्पना केली आणि आयुष्यभर त्यासाठी संघर्ष केला. त्यांना असा आधुनिक भारत घडवायचा होता, जिथे जात किंवा इतर कोणत्याही कारणावर आधारीत पूर्वग्रह नसावा; जिथे महिला आणि शतकानुशतके वंचित समुदाय आर्थिक आणि सामाजिक हक्कांबाबत समान असतील.
डॉ आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त, त्यांचे आयुष्य आणि त्यांच्या विचारांपासून शिकून आपण त्यांचे आदर्श जीवन जगण्याचा संकल्प करू आणि एक सशक्त आणि समृद्ध भारत घडवण्याच्या दिशेने योगदान देऊ.”
राष्ट्रपतींचा संदेश वाचण्यासाठी इथे क्लिक करा
S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1711524)
Visitor Counter : 252