कंपनी व्यवहार मंत्रालय
भारतीय स्पर्धा आयोग नियमावली 2009 च्या 35 व्या कलमानुसार लागू सध्याच्या गोपनीयता संरक्षणाची अंमलबजावणी तसेच गोपनीयता व्यवस्थेचा आढावा व प्रस्तावित धोरणावर नागरिकांच्या सूचना मागवल्या आहेत
Posted On:
13 APR 2021 4:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 एप्रिल 2021
भारतीय स्पर्धा आयोग नियमावली 2009 च्या 35 व्या कलमानुसार लागू केलेल्या गोपनीयता संरक्षणाची अंमलबजावणी तसेच अंमलबजावणीत येत असलेले अडथळे आणि त्यासंबंधीचा अनुभव यावर सध्याच्या गोपनीयता व्यवस्थेचा आढावा घेण्याचा निर्णय भारतीय स्पर्धा आयोगाने घेतला आहे.
त्यानुसार सार्वजनिक विचारविनिमयासाठी गोपनीयतेची व्याप्ती ठरवणारा सविस्तर प्रस्तावित मसुदा व सामान्य नियमावलीतील कलम 35 चा सुधारित मसुदा भारतीय स्पर्धा आयोगाच्या www.cci.gov.in या संकेतस्थळावर ठेवण्यात आला आहे. त्या ठिकाणी नागरिकांना आपल्या सूचना देता येतील तसेच सूचना atdregistry@cci.gov.inयेथे 12 मे 2021 पर्यंत ई-मेलने पाठवता येतील.
Jaydevi PS/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1711438)
Visitor Counter : 268