PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
Posted On:
12 APR 2021 7:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/ मुंबई 12 एप्रिल 2021
#Unite2FightCorona
#IndiaFightsCorona
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
देशव्यापी लसीकरण महोत्सवाचा आज 2 रा दिवस आहे. आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड 19 प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांनी आज 10.45 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या अंतरिम अहवालानुसार , 15,56,361 सत्रांच्या माध्यमातून एकत्रितपणे ,10,45,28,565 मात्रा देण्यात आल्या. यापैकी 90,13,289 आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीची पहिली मात्रा तर 55,24,344 आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीची दुसरी मात्रा घेतली. कोरोना विरुद्धच्या लढ्यात आघाडीवर राहून काम करणाऱ्या 99,96,879 कर्मचाऱ्यांनी (1 ली मात्रा), आघाडीवर राहून काम करणाऱ्या 47,95,756 कर्मचाऱ्यांनी (2 री मात्रा), 60 वर्षांवरील 4,05,30,321 लाभार्थ्यांनी पहिली मात्रा तर 19,42,705 लाभार्थ्यांनी दुसरी मात्रा घेतली आहे आणि 45 ते 60 वर्षे वयोगटातील 3,20,46,911 लाभार्थ्यांनी (1 ली मात्रा ) तर 6,78,360 लाभार्थ्यांनी (2 री मात्रा ) घेतली आहे.
देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या मात्रांपैकी 60.13% मात्रा आठ राज्यात देण्यात आल्या आहेत.
10 राज्यात 81% दैनंदिन नवे रुग्ण, 5 राज्यात 70.16% सक्रिय रुग्ण केंद्रीत
भारतातील एकूण सक्रिय रुग्णसंख्या 12,01,009 वर पोहोचली असून देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी ही संख्या 8.88% आहे. सक्रिय रुग्णसंख्येत गेल्या 24 तासात 92,922 रुग्णांची नोंद झाली.
भारतातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि केरळ या पाच राज्यात 70.16% रुग्ण आहेत. देशातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी एकट्या महाराष्ट्रात 47.22% रुग्ण आहेत.
रेमडेसिविर इंजेक्शन व रेमडेसिविर तयार करण्यासाठी लागणाऱ्या अत्यावश्यक घटकांच्या (API) निर्यातीवर, देशातील कोविड परिस्थितीत सुधार होईपर्यंत बंदी घालण्याचा केंद्राचा निर्णय
भारतात सध्या कोविडच्या रुग्णसंख्येत वाढ दिसून येत आहे. आज, म्हणजेच, 11 एप्रिल 2021 रोजी देशात 11.08 लाख कोविड रुग्णसंख्या असून, त्यात हळूहळू वाढ होत आहे. यामुळे कोविड रुग्णांवर उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या मागणीत अचानक वाढ झाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये या मागणीत अजून वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत.
रेमडेसिविर इंजेक्शनसाठी अमेरिकेच्या मेसर्स गिलीड सायन्सेसकडून ऐच्छिक परवाना करारान्वये सात भारतीय कंपन्या रेमडेसिविर इंजेक्शनची निर्मिती करत आहेत. त्यांची क्षमता प्रतिमहिना 38.80 लाख इतकी आहे.
या पार्श्वभूमीवर भारत सरकारने रेमडेसिविर इंजेक्शन व रेमडेसिविर इंजेक्शन तयार करण्यासाठी लागणाऱ्या अत्यावश्यक घटकांच्या (API) निर्यातीवर, कोविडसंबधित परिस्थितीत सुधार होईपर्यत बंदी घातली आहे
‘लसीकरण उत्सव’ म्हणजेच कोरोनाविरूध्दच्या दुसऱ्या मोठ्या लढाईचा प्रारंभ आहे: पंतप्रधान
कोविड लसीकरण उत्सव कोरोनाविरूध्दच्या दुसऱ्या मोठ्या लढाईचा प्रारंभ आहे,असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यासोबतच, कोविड संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी सामाजिक स्वच्छतेबरोबर वैयक्तिक स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यायला हवे, यावरही त्यांनी भर दिला. महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त या उत्सवाला आज आरंभ झाला असून, तो 14 एप्रिल म्हणजेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपर्यंत सुरू राहील.
महाराष्ट्र अपडेट्स
राज्यात रविवारी 63,294 नवीन कोरोना रुग्ण आढळले. रविवारी देशभर 11,80,136 नमुन्यांची चाचणी करण्यता आली, त्यापैकी 22% म्हणजेच 2 लाख 63 हजार 137 चाचण्या महाराष्ट्रात करण्यात आल्या. राज्यातील एकूण कोरोना रुग्णांपैकी 3 % रुग्ण गंभीर तर, 5% रुग्ण आयसीयूबाहेर मात्र ऑक्सीजनवर आहेत. एकूण रुग्णांपैकी 72% रुग्ण 21 ते 60 वयोगटातील आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राज्याच्या कोविड टास्क फोर्सची मुंबईत बैठक पार पडली. कोविड परिस्थितीवर नियंत्रणासाठी विविध उपायांवर बैठकीदरम्यान चर्चा करण्यात आली. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, राज्यात कडक उपाय योजिले जाणार आहेत. दरम्यान, राज्यातील 10 आणि 12 बोर्ड परीक्षा लांबवणीवर टाकण्यात आल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
FACT CHECK
***
S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1711221)
Visitor Counter : 212