आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

लसीकरण उत्सवाच्या पहिल्या दिवशी लसीच्या सुमारे 30 लाख मात्रा दिल्यामुळे लसीकरणाची एकूण व्याप्ती 10.45 कोटी मात्रांवर पोहोचली.


भारतात दैंनंदिन सरासरी मात्रांनी 40 लाखांचा टप्पा ओलांडला, जागतिक स्तरावर उच्चांक कायम

10 राज्यात 81% दैनंदिन नवे रुग्ण

5 राज्यात 70.16% सक्रिय रुग्ण केंद्रीत

Posted On: 12 APR 2021 11:39AM by PIB Mumbai

देशव्यापी लसीकरण महोत्सवाचा आज 2 रा दिवस आहे. आतापर्यंत देण्यात आलेल्या  कोविड 19 प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांनी आज 10.45 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

 आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या अंतरिम अहवालानुसार , 15,56,361 सत्रांच्या माध्यमातून एकत्रितपणे  ,10,45,28,565 मात्रा देण्यात आल्या. यापैकी 90,13,289 आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीची पहिली मात्रा तर  55,24,344  आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीची दुसरी मात्रा घेतली. कोरोना विरुद्धच्या लढ्यात आघाडीवर राहून काम करणाऱ्या 99,96,879 कर्मचाऱ्यांनी (1 ली मात्रा )आघाडीवर राहून काम करणाऱ्या  47,95,756 कर्मचाऱ्यांनी (2 री  मात्रा ),

60 वर्षांवरील  4,05,30,321 लाभार्थ्यांनी पहिली मात्रा तर 19,42,705 लाभार्थ्यांनी दुसरी मात्रा घेतली आहे आणि 45 ते  60 वर्षे वयोगटातील 3,20,46,911 लाभार्थ्यांनी (1 ली मात्रा ) तर  6,78,360 लाभार्थ्यांनी (2 री  मात्रा ) घेतली आहे.

 देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या मात्रांपैकी  60.13% मात्रा आठ राज्यात देण्यात आल्या आहेत .

 

 लसीकरण उत्सवाच्या  पहिल्याच दिवशी काल लसीच्या सुमारे 30 लाख मात्रा देण्यात आल्या.

 देशव्यापी लसीकरण उत्सवाच्या पहिल्याच दिवशी  63,800 कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्र कार्यरत होती ही कार्यान्वित असलेल्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्रांमध्ये झालेली 18,800 इतकी  सरासरी वाढ आहे. खाजगी कार्यस्थळांवर बहुतांश कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्र कार्यरत होती. याशिवाय सामान्यतः लसीकरणाची संख्या कमी असणारा रविवार असूनही लसीकरण महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सुमारे 30  लाख मात्रा देण्यात आल्या.

लसीकरण मोहिमेच्या 86 व्या दिवशी (11 एप्रिल ,  2021) रोजी ,  लसीच्या 29,33,418 मात्रा देण्यात आल्या. यापैकी 38,398 सत्रांच्या माध्यमातून 27,01,439  लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा आणि 2,31,979 लाभार्थ्यांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली.

 जागतिक स्तरावर दिल्या जाणाऱ्या लसीच्या दैनंदिन मात्रांच्या संख्येच्या बाबतीत ,  भारताने दररोज सरासरी 40,55,055 मात्रा देऊन अव्वल स्थान कायम राखले आहे.. ही  संख्या काल 38,34,574 होती.

 

 भारतात दैनंदिन रुग्णसंख्येतील वाढ कायम असून गेल्या 24 तासात 1,68,912 नवे रुग्ण नोंदविण्यात आले.

 महाराष्ट्रउत्तर प्रदेशदिल्लीछत्तीसगडकर्नाटककेरळतामिळनाडूमध्य प्रदेशगुजरात आणि राजस्थान या राज्यात दैनंदिन कोविड रुग्णसंख्येत वाढ दिसून आली असून 83.02% नवे रुग्ण या 10 राज्यातील आहेत .

 महारष्ट्रात सर्वाधिक  63,294 नवे रुग्ण  नोंदविण्यात आले. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेशमध्ये 15,276  तर दिल्लीत 10,774 रुग्णांची नोंद झाली.

 

 खाली दर्शविल्यानुसार,  सोळा राज्यात दैनंदिन रुग्णांमध्ये वाढ  दिसून आली  आहे.

 भारतातील एकूण सक्रिय रुग्णसंख्या 12,01,009 वर पोहोचली असून  देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी ही संख्या 8.88% आहे. सक्रिय रुग्णसंख्येत गेल्या 24 तासात 92,922 रुग्णांची नोंद झाली.

 भारतातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी महाराष्ट्रछत्तीसगडकर्नाटकउत्तर प्रदेश आणि केरळ या पाच राज्यात 70.16% रुग्ण आहेत.देशातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी  एकट्या महाराष्ट्रात 47.22% रुग्ण आहेत.

 

 आजपर्यंत भारतात एकूण 1,21,56,529 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 89.86%.आहे.

 गेल्या 24 तासात 75,086 रुग्ण बरे झाले.

 दैनंदिन मृत्यूत वाढ कायम दिसत असून गेल्या 24 तासात 904 मृत्यूंची नोंद झाली.

 एकूण नवीन मृत्यूंपैकी 89.16% मृत्यू दहा राज्यात आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक  (349)  मृत्यू झाले. त्यापाठोपाठ  छत्तीसगडमध्ये 122 मृत्यूंची नोंद झाली.

 

 नऊ राज्ये / केंद्रशासित प्रदेशात गेल्या 24 तासात एकाही कोविड 19 मृत्यूची नोंद झाली नाही . यात ओदिशाहिमाचल प्रदेशलद्दाख  (केंद्रशासित प्रदेश )दीव दमण आणि दादरा आणि नगर हवेली, ,मेघालयसिक्कीमलक्षद्वीप,अंदमान आणि निकोबार बेटे  आणि अरुणाचल प्रदेशचा  समावेश आहे.

***

JPS/SC/DY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1711132) Visitor Counter : 311