उपराष्ट्रपती कार्यालय
जम्मू काश्मीरच्या सर्वांगीण विकासाप्रति तसेच आव्हानांना तोंड देण्यासाठी भारत कटिबद्ध आहे, भारताच्या अंतर्गत प्रश्नात कोणताही बाह्य हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही : उपराष्ट्रपती
IIM, जम्मू मधील येथील तिसऱ्या आणि चौथ्या पदवीदान समारंभाला उपराष्ट्रपतींचे संबोधन
Posted On:
09 APR 2021 4:54PM by PIB Mumbai
जम्मू आणि काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहेत आणि आणि यापुढेही राहतील असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम वेंकैया नायडू यांनी आज केले. जम्मू काश्मीरच्या सर्वांगीण विकासाप्रति तसेच आव्हानांना तोंड देण्यासाठी भारत कटिबद्ध आहे, भारताच्या अंतर्गत प्रश्नात कोणताही बाह्य हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असे त्यांनी अधोरेखित केले .
IIM जम्मू येथील तिसऱ्या आणि चौथ्या पदवीदान समारंभात बोलताना नायडू यांनी आयआयएम सारख्या राष्ट्रीय संस्था यांनी नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम आखावेत तसेच बाजारपेठेतील वास्तवावर आधारित व चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या आवश्यकतेनुसार पदविकांचीही आखणी करावी असे सांगितले.
उच्च शिक्षणाची पुनर्रचना करून ते जगातील परिस्थितीनुसार सुधारण्याच्या आवश्यकतेवर उपराष्ट्रपतींनी यावेळी भर दिला. कृषी, व्यापार,तंत्रज्ञान, मानव्य आणि व्यवस्थापन अशा विविधांगी ज्ञानशाखा या अभ्यासक्रमातून एकत्र आणण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
भविष्यातील व्यवस्थापक, वेगाने बदलणाऱ्या जगाला सामोरे जाणार आहे. असे सांगत संशोधनाला प्रोत्साहन देणारा दृष्टिकोन तसेच सर्जनशीलता व उत्कृष्टतेला चालना देणाऱ्या संस्थात्मक सुधारणा याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. अनिश्चित असलेल्या या जगात निर्णय घेण्याची तुमची क्षमता तसेच नवनवे संदर्भ समजून घेऊन त्याच्यानुसार बदलण्याची तुमची तयारी यांना अत्यंत महत्त्व आहे असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
नवउद्योजक व्यवस्थापक आणि सल्लागारांना आवाहन करत त्यांनी स्वदेशी तंत्रज्ञान शोधून आपल्या क्षमतांचा उपयोग करून त्याचे प्रमाण वाढवण्याचे आवाहन केले. आपल्या कारागिरांचे परंपरागत कौशल्य तसेच कृषी उत्पन्न वाढवणे या गोष्टींसाठी कारागीर व शेतकऱ्यांना सहाय्यक ठरेल असे तंत्रज्ञान आणण्याचेही त्यांनी सुचवले.
उद्योग आणि संस्था हे बंध आणखी बळकट झाले पाहिजेत यावर त्यांनी भर दिला. वास्तव जगातील समस्या सोडवताना विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयातील मूलभूत गोष्टींचे ज्ञान होऊ शकते . तरुण माणसांकडील नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आपल्या उद्योगांनाही लाभदायक होऊ शकते असे ते म्हणाले.
पुरातन काळापासून जम्मू आणि काश्मीर ही शिक्षणाची महत्त्वपूर्ण केंद्रे राहिली असल्याची आठवण त्यांनी या पदवीदान समारंभात करून दिली. पतंजलि, आनंदवर्धन, लल्लेश्वरी आणि हब्बा खातून यासारख्या या भागातील महान व्यक्तीची कामे अधोरेखित करत त्यांनी शिक्षण आणि संशोधन या क्षेत्रातील ज्ञानाचे संचित कायम आणि वृद्धिंगत करण्यास सांगितले.
या संस्थेच्या अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रगतीचा गौरव करत उपराष्ट्रपतींनी एमबीए व व्यवस्थापन क्षेत्रात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच व्यवस्थापनाला शुभेच्छा दिल्या.
M.Chopade/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1710682)
Visitor Counter : 175