शिक्षण मंत्रालय

केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी  मायक्रोसेन्सर  आधारित नॅनो स्निफर या एक्सप्लोसिव्ह ट्रेस डिटेक्टरचा शुभारंभ केला


मायक्रोसेन्सर तंत्रज्ञानाचा वापर करणारे नॅनो स्निफर हे  जगातील पहिले एक्सप्लोसिव्ह  ट्रेस डिटेक्टर आहे - केंद्रीय शिक्षण मंत्री

नॅनो स्निफर  हे संशोधन, विकास आणि उत्पादन या दृष्टीने 100% मेड इन इंडिया उत्पादन आहे -  रमेश पोखरियाल ‘निशंक’

हे किफायतशीर उपकरण आयात एक्सप्लोसिव्ह  ट्रेस डिटेक्टर उपकरणांवरचे आपले अवलंबत्व  कमी करेल -  रमेश पोखरियाल ‘निशंक’

नॅनो स्निफर 10 सेकंदापेक्षा कमी वेळेत  स्फोटकांचा शोध घेऊ शकते  - केंद्रीय शिक्षण मंत्री

Posted On: 09 APR 2021 4:40PM by PIB Mumbai

 

केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंकयांनी आज नॅनोस्निफ टेक्नोलॉजीज या आयआयटी बॉम्बे इनक्युबेटेड स्टार्टअपद्वारा विकसित नॅनो स्निफर या जगातील पहिल्या  मायक्रोसेन्सर आधारित एक्सप्लोसिव ट्रेस डिटेक्टरचा  (ईटीडी) शुभारंभ केला.  आयआयटी दिल्लीचे संचालक  व्ही. रामगोपाल राव आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Launching NanoSniffer Explosive trace detector (IITB and IITD). https://t.co/GVayhSGJLi

— Dr. Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) April 9, 2021

वेहांत टेक्नॉलॉजीज या आयआयटी दिल्लीच्या क्रिटिकल सोल्यूशन्स  इनक्युबेटेड स्टार्टअपने  नॅनोस्निफरचे विपणन केले  आहे.

यावेळी बोलताना पोखरियाल म्हणाले की नॅनोस्निफ टेक्नोलॉजीजने विकसित केलेले नॅनोस्निफर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वावलंबी भारताच्या स्वप्नाच्या दिशेने एक पाऊल आहे. नॅनोस्निफर हे संशोधन, विकास आणि उत्पादन या बाबतीत 100% मेड इन इंडिया उत्पादन आहे. नॅनोस्निफरचे मूळ तंत्रज्ञान अमेरिका आणि युरोपमधील पेटंटद्वारे सुरक्षित आहे. ते पुढे म्हणाले की, हे किफायतशीर उपकरण आयात एक्सप्लोसिव्ह  ट्रेस डिटेक्टर उपकरणांवरचे आपले अवलंबत्व  कमी करेल.  हे इतर संस्था, स्टार्टअप्स आणि मध्यम-उद्योगांना स्वदेशी उत्पादनांचे संशोधन आणि विकास करण्यास प्रोत्साहित करेल.  लॅब टू मार्केट उत्पादनाचे हे परिपूर्ण उदाहरण आहे, असेही त्यांनी सांगितले.

2.jpg1.jpg

एक्सप्लोसिव्ह ट्रेस डिटेक्टर डिव्हाइस (ईटीडी) - नॅनोस्निफर हे 10 सेकंदांपेक्षा कमी कालावधीत स्फोटके शोधू शकते आणि स्फोटकांचे  वेगवेगळ्या श्रेणीत वर्गीकरण करू शकते. ते  सैन्य, पारंपारिक आणि घरगुती स्फोटकांच्या सर्व श्रेणीचा शोध घेते.  नॅनोस्निफर सूर्यप्रकाशात वाचता येईल अशा कलर डिस्प्लेसह  दृश्य आणि ऐकू येतील असे इशारे  देतो, असेही ते म्हणाले.

केंद्रीय शिक्षणमंत्री म्हणाले की या उत्पादनाच्या विकासासह आयआयटी बॉम्बे आणि आयआयटी दिल्ली आणि त्यांच्या अन्य  कंपन्या प्रगत व परवडणार्‍या स्वदेशी उत्पादनांसह देशाच्या सुरक्षेला चालना देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. हे शैक्षणिक आणि उद्योग सहकार्याचे एक उत्तम उदाहरण आहे, जे भारतातील इतर स्टार्टअप्ससमोर एक उदाहरण ठरेल. आपला देश  प्रतिभावान, ज्ञानी आणि कष्टकरी उद्योजकांनी परिपूर्ण असताना आपण परदेशी उत्पादने का आयात करावीआता आपला देश नॅनोस्निफर, स्फोटक ट्रेस डिटेक्टर सारख्या उत्पादनांचा विकास आणि उत्पादन करत आहे ही आनंदाची बाब आहे.

भौगोलिक-राजकीय स्थितीमुळे  आपल्या देशाला सातत्याने धोका उद्भवत असून  विमानतळ, रेल्वे आणि मेट्रो स्थानके, हॉटेल, मॉल्स आणि इतर सार्वजनिक ठिकाणासारख्या  उच्च सुरक्षेच्या  ठिकाणी स्फोटके आणि प्रतिबंधात्मक तपासणी हा एक नियम बनला आहे. अशा ठिकाणांवर लोक तसेच सामानाच्या तपासणीसाठी   वेगवान  स्कॅनिंगसाठी प्रगत शोध उपकरणे वापरली जात  आहेत. स्फोटक शोधण्यासाठी जवळपास ही सर्व उत्पादने मोठी किंमत मोजून  आयात केली जातात ज्यामुळे देशाला मौल्यवान परकीय चलन गमवावे लागते.  अशा उत्पादनांसाठी नॅनोस्निफर एक योग्य  पर्याय आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता/मशीन लर्निंग-आधारित शारीरिक सुरक्षा, देखरेख आणि वाहतूक निरीक्षण आणि जंक्शन अंमलबजावणी सोल्यूशन्समध्ये अग्रणी असलेल्या वेहांत टेक्नॉलॉजीबरोबर नॅनोस्निफ टेक्नॉलॉजीजने भागीदारी केली आहे.

नॅनो-स्निफर अतिशय सूक्ष्म स्फोटकांचा  शोध घेते आणि काही  सेकंदात त्याचे निष्कर्ष देते. ते  अचूकपणे सैन्य, व्यावसायिक आणि घरगुती  स्फोटकांचा धोका  शोधू शकते. अल्गोरिदमचे आणखी  विश्लेषण केल्यामुळे स्फोटकांचे योग्य श्रेणीत  वर्गीकरण करण्यास देखील मदत होते.  एमईएमएस सेन्सरसह,स्थानिक निर्मितीतून यामुळे  देशाची  आयात खर्चाची खूप बचत होईल.

नॅनोस्निफरने  पुणे स्थित  डीआरडीओची उच्च ऊर्जा सामग्री संशोधन प्रयोगशाळा (एचईएमआरएल) चाचणी यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे आणि देशातील दहशतवाद प्रतिबंधक दल अर्थात  राष्ट्रीय सुरक्षा दलाने  (एनएसजी) देखील त्याची चाचणी घेतली आहे.

 

M.Chopade/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1710676) Visitor Counter : 291