रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी झेंडा दाखवून एनएचआयडीसीएलने खरेदी केलेल्या मुलभूत सेवा पुरविणाऱ्या रुग्णवाहिकांच्या कार्याची सुरुवात केली
Posted On:
07 APR 2021 3:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 एप्रिल 2021
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग तसेच सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री जनरल (निवृत्त) व्ही.के.सिंग यांनी आज सकाळी नवी दिल्ली येथे झेंडा दाखवून अंदमान-निकोबार द्वीपसमूह, अरुणाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, लडाख, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा आणि उत्तराखंड या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्राथमिक स्वरुपाची आरोग्य सेवा पुरविणाऱ्या 90 मुलभूत सेवा रुग्णवाहिका कार्यान्वित केल्या.
- रस्ते अपघात आकडेवारीनुसार, देशात रोज रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्या 415 व्यक्तींना अपघात झाल्यानंतर लगेचच्या सुवर्णक्षण कालावधीत तातडीची आणि मुलभूत वैद्यकीय मदत मिळाली तर त्यापैकी 40% व्यक्तींचा जीव वाचू शकतो.
- मुलभूत जीवनरक्षक प्रणाली असलेल्या रुग्णवाहिका गंभीररित्या जखमी व्यक्तीची तब्येत स्थिर करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात
तक्ता
S.N.
|
Particulars
|
Details
|
1
|
Initiative By
|
NHIDCL
|
2
|
Ambulances manufactured by
|
M/s. TATA Motors
|
3
|
No. of Ambulances procured by NHIDCL
|
90
|
4
|
Cost of 01 Ambulance
|
Rs. 20.70 lakhs + GST
|
5
|
Total cost of 90 ambulances
|
Rs. 18.63 Crores + GST
|
6
|
Ambulances handed over to State Governments and UT administrations:
|
Andaman-Nicobar Island, Arunachal Pradesh, Assam, J&K, Ladakh, Manipur, Meghalaya, Mizoram, Nagaland, Sikkim, Tripura, and Uttarakhand
*Assam not covered due to elections
|
M.Chopade/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1710098)
Visitor Counter : 218