भारतीय निवडणूक आयोग

केरळ, तामिळनाडू, पुदुच्चेरीमध्ये आणि आसाम आणि पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या तिसऱ्या फेरीसाठी शांततेत मतदान


475 विधानसभा मतदारसंघातील 1.5 लाख मतदान केंद्रावर झाले मतदान

Posted On: 06 APR 2021 9:54PM by PIB Mumbai

 

केरळ, तामिळनाडू, पुदुच्चेरी या राज्यांमधील आणि आसाम आणि पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या तिसऱ्या फेरीसाठी 475 विधानसभा मतदारसंघातील 1,53,538 मतदान केंद्रांवर आज शांततेत मतदान झाले. सामाजिक अंतर राखण्याच्या उद्देशाने प्रत्येक मतदान केंद्रावरील मतदारांच्या संख्या 1500 वरून 1000 पर्यंत कमी करण्यात आल्याने मतदान केंद्रांच्या संख्येत वाढ करण्यात आली.

या मतदानामधील मतदार, मतदान केंद्रे आणि निरीक्षक यांचा तपशील खालील प्रमाणेः

Table 1

State

Kerala

Tamil Nadu

Puducherry

Assam 3rd Phase

West Bengal 3rd Phase

Assembly Constituencies

140

234

30

40

31

No of Polling Stations

40771

88,937

1558

11,401

 

10,871

 

Registered Electors

2,75,03,199

6,28,69,955

1004197

79,19,641

78,52,425

No of General observers deployed

70

150

11

33

22

No of Police observers deployed

20

41

5

9

7

No of Expenditure observers deployed

40

119

12

17

9

% of voting till 5 PM

69.95%

64.92%

77.90%

78.94%

77.68%

Total Number of Assembly Constituencies = 475 (1)

Total Number of Contesting Candidates = 5821

एकूण विधानसभा मतदारसंघ = 475

निवडणूक लढवणारे एकूण उमेदवार = 5821

निवडणुका समावेशक आणि सर्वांना सहभागी करून घेणाऱ्या व्हाव्यात या उद्देशाने निवडणूक आयोगाने दिव्यांग, 80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, कोविड-19 संसर्ग असलेले संशयित किंवा संसर्गग्रस्त आणि अत्यावश्यक सेवेत तैनात असलेल्या व्यक्तींसाठी टपालाद्वारे मतदानाचा पर्याय उपलब्ध केला आहे. या मतदारांना या सुविधा योग्य प्रकारे उपलब्ध झाल्या की नाही यावर निरीक्षकांनी देखरेख केली.

दिव्यांग आणि 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मतदारांचे तपशील पुढील प्रमाणे आहेत:

एकूण दिव्यांग मतदार = 906763

WhatsApp Image 2021-04-06 at 5.16.40 PM

80 वर्षांपेक्षा जास्त वयाचे एकूण मतदार = 2152210

WhatsApp Image 2021-04-06 at 5.16.40 PM (1)

Details of PWD Electors and 80+ Electors are as follows:

Table 2

State

Kerala

Tamil Nadu

Puducherry

Assam 3rd Phase

West Bengal 3rd Phase

Total

PWD Electors

294718

4,81,899

12038

54,148

64,083

9,06,763

80+ Electors

622064

12,87,457

17146

99,471

1,26,177

21,52,210

 

मुक्त आणि न्याय्य पद्धतीने निवडणुकांचे आयोजन होण्याच्या उद्देशाने संवेदनशील आणि उपद्रवाची सर्वात जास्त शक्यता असलेल्या मतदान केंद्रांसह 50 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान केंद्रांवर सुरक्षित आणि संरक्षक पद्धतीने मतदान होण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निकषांनुसार कॅमेऱ्यांद्वारे थेट देखरेख आणि वेबकास्टिंग करण्यात आले. निवडणूक आयोग, सीईओ, डीईओ, निरीक्षक या सर्वांना हे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येते होते आणि या मतदान केंद्रांवर बारकाईने लक्ष ठेवता येत होते.

निवडणुकांच्या या टप्प्यात पाच राज्यांमध्ये 6 एप्रिल, 2021 पर्यंत विक्रमी 947.98 कोटी रुपयांची सामग्री जप्त करण्यात आली. यामध्ये रोख रक्कम, मद्य, अंमली पदार्थ, मोफत भेटवस्तूंचा समावेश होता. यापूर्वी 2016 मध्ये झालेल्या निवडणुकांच्या तुलनेत केलेल्या 225.77 कोटी रुपयांच्या जप्तीपेक्षा हे प्रमाण 4.198 पटीने जास्त आहे. निवडणुका मुक्त पद्धतीने व्हाव्यात आणि त्यामध्ये पैशाचा, मद्य किंवा इतर प्रलोभनांचा वापर होऊ नये, यासाठी निवडणूक आयोग सातत्याने प्रयत्नशील असतो. या गैरप्रकारांना रोखण्यासाठी 4606 भरारी पथके आणि 4670 जागेवर देखरेख ठेवणारी पथके तैनात करण्यात आली होती आणि डीईओ, जिल्ह्यातील निवडणूक खर्च निरीक्षक आणि विशेष निरीक्षकांकडून त्यांना बारकाईने मार्गदर्शन करण्यात येत होते. आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू आणि पुदुच्चेरीमध्ये विविध ठिकाणी प्राप्तिकर विभागाची एकूण 19 हवाई गुप्तचर पथके देखील तैनात करण्यात आली आहेत. 

6-4-2021 च्या दुपारपूर्वी केलेल्या जप्तीच्या कारवाईचा राज्यनिहाय आणि वस्तूनिहाय तपशील

WhatsApp Image 2021-04-06 at 1.22.42 PM

मोफत भेटवस्तूंची जप्ती

अंमली पदार्थांची जप्ती

मौल्यवान धातूंची जप्ती

सीव्हीजील ऍपच्या माध्यमातून आदर्श आचारसंहिता उल्लंघनाच्या 1,87,146 प्रकरणांची नोंद झाली आणि त्यापैकी 1,86,647 प्रकरणांचा आज निपटारा करण्यात आला( सायं. 4 पर्यंत)

सर्व मतदान केंद्रांवर कोविड-19 सुरक्षा नियमावलीचे पालन करण्यात आले. मतदार आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सर्व मतदान केंद्रे मतदानाच्या एक दिवस आधी निर्जंतुक करण्यात आली आणि या केंद्रांवर थर्मल स्कॅनिंग, हँड सॅनिटायजर्स, फेस मास्क यांसारख्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. सामाजिक अंतराच्या योग्य त्या व्यवस्था करण्यात आल्या होत्या.

या मतदान प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सर्व संबंधितांचे विशेषतः मतदारांच्या उत्साही आणि निर्भय सहभागाबद्दल निवडणूक आयोगाने आभार मानले आहेत. कोविड प्रतिबंधक नियमावलीचे पालन करून या निवडणुकांमध्ये सहभागी झाल्याबद्दल दिव्यांग मतदार, ज्येष्ठ नागरिक आणि संरक्षण दलांमधील कर्मचाऱ्यांचे आयोगाने विशेष आभार मानले आहेत.

निवडणुकीशी संबंधित ताजी माहिती, छायाचित्रे आणि इतर तपशीलासाठी कृपया आमच्या eci.gov.  या संकेतस्थळाला आणि  @SpokespersonECI आणि @ECISVEEP या ट्वीटर हँडलला भेट द्या.  उच्च क्षमतेच्या छायाचित्रांसाठी  https://pib.gov.in  येथे भेट द्या.

***

Jaydevi PS/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1709967) Visitor Counter : 228