संरक्षण मंत्रालय

शांतीर ऑग्रोशेना 2021 या बहुराष्ट्रीय लष्करी कवायतींचा उद्घाटन समारंभ

Posted On: 05 APR 2021 10:21AM by PIB Mumbai

बांगलादेशमधल्या बंगबंधू सेनानिबास इथे 4 एप्रिल 2021 ला  बहुराष्ट्रीय लष्करी कवायती शांतीर ऑग्रोशेना 2021 सुरु झाल्या. बांगलादेशचे राष्ट्रपिता बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांची जन्म शताब्दी आणि  बांगलादेशच्या स्वातंत्र्याची पन्नास वर्षे साजरी  करण्यासाठी या कवायती होत आहेत. भारतीय लष्कराचे 30 जणांचे पथक  यामध्ये सहभागी होत असून  रॉयल भूतान आर्मी,श्रीलंकेचे लष्कर यांच्यासह बांगलादेशचे लष्करही सहभागी होत आहे. 12 एप्रिल पर्यंत सुरु राहणाऱ्या या कवायतीसाठी अमेरिका, ब्रिटन,तुर्कस्तान, सौदी अरेबिया, कुवेत आणि सिंगापोर या देशांमधले लष्करी निरीक्षकही उपस्थित राहणार आहेत.  
आपल्या प्रांतांत शांतता राखण्यासाठी कार्यवाही सुनिश्चित करण्या बरोबरच शेजारी राष्ट्रांमध्ये आंतर कार्यान्वयन वृद्धिंगत करण्यासाठी आणि प्रक्रिया बळकट करण्याचा या कवायतींचा उद्देश आहे. या कवायतींमध्ये सहभागी होणाऱ्या देशांची लष्करे आपले मौल्यवान अनुभव इतरांना कथन करतील.

JPS/NC/DY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1709629) Visitor Counter : 279