गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तीन एप्रिल रोजी छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या सैनिकांना वाहिली श्रद्धांजली
प्रविष्टि तिथि:
04 APR 2021 10:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 एप्रिल 2021
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छत्तीसगडमध्ये 3 एप्रिल रोजी नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. अमित शहा म्हणाले की, सैनिकांनी देशासाठी केलेले बलिदान व्यर्थ ठरणार नाही याची शहीदांच्या कुटुंबीयांना आणि देशाला मी खात्री देतो.
अमित शहा म्हणाले की नक्षलवाद्यांविरूद्ध आमचा लढा सामर्थ्य, चिकाटी व तीव्रतेने सुरू राहील आणि आम्ही तो शेवटपर्यंत घेऊन जाऊ.
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले,की आकडेवारीबाबत मला अद्याप काही सांगायचे नाही कारण शोधमोहीम सुरू आहे.

अमित शहा यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि गृह मंत्रालय, गुप्तचर विभाग आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली.
M.Chopade/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1709541)
आगंतुक पटल : 217