रेल्वे मंत्रालय
भारतीय रेल्वेने आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये लोडिंग आणि महसुलाच्या बाबतीत सर्वाधिक मालवाहतुकीचे आकडे नोंदवले
Posted On:
01 APR 2021 6:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 एप्रिल 2021
कोविड आव्हाने असूनही भारतीय रेल्वेने आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये विक्रमी मालवाहतूक नोंदवली.
आर्थिक वर्ष 2020-21 च्या शेवटच्या महिन्यात भारतीय रेल्वेने मागील वर्षाच्या 1209.32 लोडिंगच्या तुलनेत यावर्षी 1232.63 लोडिंगसह 1.93 टक्के इतकी वाढ नोंदवली.
या काळात भारतीय रेल्वेने मालवाहतुकीतून 1,17,386 कोटी रुपये कमाई केली. ही मागील वर्षाच्या 1,13,897 कोटी रुपये कमाईपेक्षा 3 % जास्त आहे .
सप्टेंबर 2020 ते मार्च 2021 या कालावधीत सलग 07 संबंधित महिन्यांमध्ये भारतीय रेल्वेने सर्वाधिक लोडिंगचा वेग कायम ठेवला आहे.
मिशन मोडवर, मार्च 2021 महिन्यात भारतीय रेल्वेच्या मालवाहतुकीने मागील वर्षीतील लोडिंग आणि महसुलाचा टप्पा ओलांडला आहे.
M.Chopade/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1709055)
Visitor Counter : 279