उपराष्ट्रपती कार्यालय
लोकांनी आपले प्रतिनिधी - चारित्र्य, वर्तन , गुणवत्ता आणि क्षमता या आधारे निवडले पाहिजेत : उपराष्ट्रपती
‘नागरिककेंद्री कारभार शासन-केंद्रित मतदारांमधून येईल’
सर्वांचे जीवनमान सुलभ करण्यासाठी सुटसुटीत प्रशासन : उपराष्ट्रपती नायडू
निवृत्त नागरी सेवक डॉ. शैलेंद्र जोशी यांच्या ‘सुपरिपालन ’पुस्तकाचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते प्रकाशन
Posted On:
01 APR 2021 2:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 एप्रिल 2021
उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी लोकांनी आपले प्रतिनिधी - चारित्र्य, वर्तन , गुणवत्ता आणि क्षमता या आधारे निवडले पाहिजेत या गरजेवर भर दिला.
तेलंगणचे माजी मुख्य सचिव एस.के. जोशी यांनी लिहिलेले “इको टी कॉलिंगः टूवर्ड पीपल-सेंट्रिक गव्हर्नन्स” चे तेलगू भाषांतर 'सुपरिपालन ' पुस्तकाचे प्रकाशन करताना, उपराष्ट्रपती म्हणाले की दुर्दैवाने 4 सी -(Caste, Community, Cash and Criminality) - जाती, समुदाय, रोकड आणि गुन्हेगारी यांनी - चारित्र्य, वर्तन , गुणवत्ता आणि क्षमता (Character, Conduct, Calibre and Capacity) यांची जागा घेतली आहे,जे चांगल्या कारभारासाठी आवश्यक आहेत. “नागरिक-केंद्रीत शासन हे शासन-केंद्रित मतदारांमधून येईल”, असे त्यांनी स्पष्ट केले.
उपराष्ट्रपती म्हणाले की, लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि विविध योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी सुशासन आवश्यक आहे. ते म्हणाले, “आनंद हा सुशासनाबरोबर येतो”.
निवडलेल्या सरकारांना ‘जनतेचे विश्वासपात्र ’ असे संबोधित करताना नायडू यांनी त्यांना जबाबदारीने कृती करण्याची व लोकांची विवेकबुद्धीने सेवा करण्याचा सल्ला दिला. सर्व नागरिकांचे जीवनमान सुधारावे यासाठी सरकारचे प्रयत्न एकप्रवाही असावेत असे आवाहन त्यांनी केले.
नायडू यांनी लेखक डॉ. शैलेंद्र जोशी, अनुवादक अन्नवरपू ब्रह्मैया आणि प्रकाशक मारुती यांचे या पुस्तकासाठी कौतुक केले.
Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1708949)
Visitor Counter : 271