रसायन आणि खते मंत्रालय

प्रोजेक्ट्स अँन्ड डेव्हलपमेंट इंडिया लिमिटेडकडून 2019-20 या वित्तीय वर्षासाठी 9.55 कोटी रुपयांचा लाभांश आणि 2020-21 या वित्तीय वर्षासाठी 6.93 कोटी रुपयांचा अंतरिम लाभांश केंद्रीय रसायन आणि खत मंत्र्यांना सुपूर्द

Posted On: 30 MAR 2021 6:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 मार्च 2021


केंद्रीय रसायन आणि खत मंत्री डी व्ही सदानंद गौडा यांना आज पीडीआयएल अर्थात प्रोजेक्ट्स अँन्ड डेव्हलपमेंट इंडिया लिमिटेडचे वित्त संचालक डी एस सुधाकर रमैया यांनी   2019-20 या वित्तीय  वर्षासाठी 9.55 कोटी रुपयांचा लाभांश आणि 2020-21 या वित्तीय वर्षासाठी 6.93 कोटी रुपयांच्या  अंतरिम लाभांशाचा धनादेश सुपूर्द केला. खत सचिव आर के चतुर्वेदी आणि सह सचिव अपर्णा शर्मा आणि पीडीआयएलचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001XE0O.jpg   https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002OI9T.jpg

2019-20 या वर्षात प्रोजेक्ट्स अँन्ड डेव्हलपमेंट इंडियाने, कार्यात्मक घडामोडीद्वारे 133.01 कोटी रुपयांचा महसूल, 142.16  कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न, करारापूर्वीचा नफा 45.86कोटी रुपये तर करारा नंतरचा नफा 31.83 कोटी रुपये अशी  ऐतिहासिक वित्तीय कामगिरी केली आहे.

 हिंदुस्तान उर्वरक अँन्ड रसायन लिमिटेडचे तीन महत्वाचे प्रकल्प, तालचेर प्रकल्प यासाठी  पीडीआयएल सध्या प्रकल्प व्यवस्थापन सल्ला पुरवत असून तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रात विविध इतर  कार्यादेशाची  अंमलबजावणी करत आहे.

प्रोजेक्ट्स अँन्ड डेव्हलपमेंट इंडिया लिमिटेड ही मिनी रत्न श्रेणी -1 ची महत्वाची डिझाईन अभियांत्रिकी आणि सल्ला सेवा संस्था आहे. प्रकल्प पूर्व कार्य,प्रकल्प व्यवस्थापन सल्ला, डिझाईन आणि अभियांत्रिकी तसेच गुणवत्ता हमी यासंदर्भात पीडीआयएल, सेवा पुरवते.


* * *

Jaydevi PS/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1708538) Visitor Counter : 178