पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांच्या हस्ते बांगलादेशातील जेशोरेश्वरी काली शक्तीपीठ येथे पूजा संपन्न

Posted On: 27 MAR 2021 11:16AM by PIB Mumbai

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसीय बांगलादेश भेटीच्या आजच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधानांनी काली मातेचे आशिर्वाद घेतले.पंतप्रधानांनी  जेशोरेश्वरी काली शक्तीपीठ,सत्खिरा येथे पूजा केली, जे पुराणातील परंपरेनुसार देवीच्या 51 शक्तिपीठांपैकी एक आहे.पंतप्रधानांनी चांदी आणि सोन्याचा मुलामा दिलेला हातांनी तयार केलेला मुकुट देवीला अर्पण केला. हा मुकुट एका स्थानिक हस्तकला कारागिरानी तीन आठवड्यात तयार केला आहे.

 

मैत्रीचा हात पुढे करत पंतप्रधानांनी देवीच्या मंदिरालालगत एक सभागृह- कम-चक्रीवादळ निवारा केंद्र बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. या बांधकामाचा उपयोग भक्तांना काली देवतेची वार्षिक पूजा आणि  जत्रा या दरम्यान करता येईल, तसेच ते सर्व धर्मांच्या  विशाल श्रध्देय समुदायांसाठी वादळ निवारण केंद्र आणि सामुदायिक सुविधा म्हणूनही उपयोगात आणता येईल.

***

Jaydevi PS/PS/CY

****

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1708024) Visitor Counter : 201