वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

व्यापार संबंध मजबूत करण्यास भारत आणि अमेरिकेची सहमती

Posted On: 26 MAR 2021 6:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 मार्च 2021

केंद्रीय वाणिज्य व उद्योग, रेल्वे आणि ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांनी 25 मार्च 2021 रोजी व्हिडिओ कॉलद्वारे अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी (यूएसटीआर), राजदूत कॅथरिन ताई यांच्याशी अतिशय फलद्रुप चर्चा केली.

कॅथरीन ताई यांची अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल पीयूष गोयल यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी बऱ्याच विषयांवर चर्चा केली आणि भारत-अमेरिका दरम्यानचे व्यापार आणि गुंतवणूक संबंध दृढ करण्यासाठी सहमती दर्शविली. या संभाषणात मोकळेपणा, पारदर्शकता आणि न्याय्य व्यापार या तत्त्वांचे समर्थन करणाऱ्या समविचारी लोकशाही दरम्यान आर्थिक भागीदारी वृद्धिंगत करण्याचा समावेश होता.

दोघांनी सामायिक उद्दीष्टांच्या जोरावर भारत आणि अमेरिका दरम्यानच्या आर्थिक सहकार्याबाबत आणि परस्पर संवाद व चर्चेच्या माध्यमातून प्रलंबित वारसा प्रश्न सोडविण्यास सहमती दर्शविली. भारत-अमेरिका व्यापार धोरण मंच (टीपीएफ) बळकट करण्यासाठी आणि 2021 मध्ये या मंचाची पुढील मंत्री-स्तरीय बैठक बोलवण्यावरही त्यांनी सहमती दर्शविली.

 

S.Tupe/V.Joshi/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1707885) Visitor Counter : 340