आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

इकोनॉमिक टाईम्सच्या ‘भविष्याला नवा आकार’ या परिषदेत’ डॉ हर्ष वर्धन यांचे बीज भाषण


लसीकरण अभियान ही ‘लोक सहभाग चळवळ’असल्याचे डॉ हर्ष वर्धन यांचे प्रतिपादन

Posted On: 26 MAR 2021 4:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 मार्च 2021

इकोनॉमिक टाईम्सच्या ‘ भविष्याला नवा आकार’ या परिषदेत, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री  डॉ हर्ष वर्धन यांनी दूर दृश्य प्रणालीद्वारे बीज भाषण केले.

गेल्या वर्षी जग ज्या बाबीमुळे ढवळून निघाले त्याचे स्मरण करतानाच भारत बळकट,सुजाण, अधिक एकजूट असलेले राष्ट्र म्हणून जगासमोर आले त्याचाही उल्लेख त्यांनी केला. 2020 हे वर्ष विज्ञानाचे वर्ष आहे असे आपले मत असल्याचे त्यांनी सांगितले. लस विकसित करण्यासाठी साधारणतः अनेक वर्षाचा कालावधी लागतो, किंबहुना अनेक दशके लागतात, ती प्रक्रिया 11 महिन्यापर्यंत  आल्याचे ते म्हणाले.याआधी अज्ञात अशा विषाणू विरोधात गेल्या जानेवारीत संशोधन सुरु झाले आणि आता आपल्याकडे केवळ एक नव्हे तर आणखी लसी असून वर्ष अखेर पूर्वी लाखो लोकांना त्या देण्यात येणार आहेत. कोविड-19 च्या इतर प्रकारच्या लसीही तयार होण्याच्या मार्गावर आहेत असे ते म्हणाले. दोन्ही लसींचे उत्पादन भारतात होत असले तरी भारतात विकसित बायोटेकची कोवाक्सीन ही लस आत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत निर्माण करण्यात येत असून भारताची वैज्ञानिक कुशाग्रता आणि लस विकसित करण्याची क्षमता यांचे दर्शन यातून जगाला घडत असल्याचे डॉ हर्ष वर्धन यांनी सांगितले.

चाचण्या, रुग्णाच्या संपर्कातल्या व्यक्तींचा शोध आणि उपचार या त्रिसूत्रीवर भर देतानाच राबवण्यात आलेले वर्तनात्मक परिवर्तन अभियान यावर रुग्ण बरे होण्याचा भारताचा सर्वोच्च दर आणि अल्प मृत्यू दर यांचे गमक सामावल्याचे त्यांनी सांगितले.

भारताच्या कोविड -19 लसीकरण अभियानाची गाथाही त्यांनी  यावेळी सादर केली. 16 जानेवारी 2021 ला भारताने SARS-CoV-2 विषाणू विरोधात राष्ट्रीय लसीकरण अभियानाला सुरवात केली. या दिवशी लसीकरण झालेल्यांची संख्या ही जगातल्या पहिल्याच दिवशी लसीकरण झालेल्या लाभार्थींच्या संख्येपैकी सर्वोच्च संख्या होती. लसीकरणासाठी आपले पहिले प्राधान्य होते ते आपले आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवर राहून कार्यरत असलेले आपले कर्मचारी यांना.

पहिल्या 34 दिवसात आपण लसीकरणाचा  1 कोटीचा  टप्पा गाठला. त्यानंतरच्या आठवड्यात आपण इतर प्राधान्य गटांना लस खुली केली. काही दिवसापूर्वीच 1 एप्रिलपासून 45 वर्षावरील सर्व नागरिकांना, त्यांना कोणतीही व्याधी असली किंवा नसली तरीही लस  घेता येईल असे सरकारने जाहीर केले आहे. इतर घटकांसाठीही कोविड-19 लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याबाबत सरकारने आधीच विचार केल्याचे ते म्हणाले.

लसीकरण अभियानाचे नियोजन आणि अंमलबजावणी यासाठी भारताने अमलात आणलेल्या समन्वयपूर्ण दृष्टीकोनाची प्रशंसा करतानाच एखादा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी संघराज्यीय व्यवस्था उत्तम ताळमेळ  साधत कसे काम करू शकते याचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. विविध मंत्रालये, विभाग, व्यावसायिक संघटना, वैद्यकीय महाविद्यालये,स्वयंसेवी संस्था,प्रसार माध्यमे, खजगी क्षेत्र,युवा आणि महिला स्वयंसेवी गट या सारख्या संबंधीताना सामावून घेत जन भागीदारी चळवळ म्हणून लसीकरण अभियानाचा समन्वय साधण्यात येत आहे.

कोविड पश्चात युगाला आकार देण्यात भारताच्या पाऊल खुणांसह,‘व्हॅक्सीन मैत्री’ या उपक्रमाद्वारे जागतिक कोविड लसीकरणात भारताचे योगदान त्यांनी विषद केले.

 

 

Jaydevi PS/N.Chitale/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1707820) Visitor Counter : 196