रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यांच्या बाजूला 600 हून अधिक ठिकाणी सोयीसुविधा विकसित करेल

Posted On: 24 MAR 2021 8:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 मार्च 2021

 

राष्ट्रीय महामार्गावरील प्रवाशांच्या अनुभवात सुधारणा व्हावी यादृष्टीने प्रवासी आणि ट्रक चालक या दोघांसाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) यांच्याकडून आगामी पाच वर्षात 22 राज्यातील राष्ट्रीय महामार्गावरील 600 हून अधिक ठिकाणी जागतिक स्तरावरील ''रस्त्याच्या कडेला सुविधा'  विकसित केल्या  जाणार आहेत. यापैकी 2021-22 मध्ये 130 मार्गांवर या सुविधा विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे. 120 मार्गावर अशाप्रकारच्या सुविधा विकसित करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने निविदा मागविल्या आहेत. योजनेनुसार विद्यमान आणि आगामी काळात बांधण्यात येणाऱ्या महामार्ग आणि द्रुतगती मार्गावर प्रत्येकी 30-50 किलोमीटरवर रस्त्याच्या कडेला या सुविधा विकसित केल्या  जातील. या सुविधांमध्ये  इंधन स्थानक, इलेक्ट्रिक चार्जिंगची सोय, उपहारगृह , किरकोळ दुकाने , एटीएम, आंघोळीच्या  सुविधेसह शौचालय, लहान मुलांना खेळण्यासाठी जागा, दवाखाना, स्थानिक हस्तकला वस्तूंचे व्हिलेज हाट इत्यादी सोयी प्रवाशांसाठी उपलब्ध असतील.

देशभरात एकत्रित मिळून 3,000 हेक्टर जागेवर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण रस्त्याच्या बाजूने या सुविधा विकसित करेल. या सुविधा गुंतवणूकदार, विकासक, ऑपरेटर्स आणि किरकोळ विक्रेत्यांना मोठ्या संधी देतील. सध्या, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, विद्यमान महामार्गांवर रस्त्याच्या बाजूने सोयी सुविधांचा  विकास आणि संचलन सार्वजनिक खाजगी भागीदारीच्या माध्यमातून करीत आहे.

या रस्त्याच्या कडेला विकसित केल्या जाणाऱ्या  सोयी-सुविधा  प्रवाशांचा महामार्गावरील प्रवास अधिक सुखावह तर करतीलच परंतु महामार्गाचा  वापर करणाऱ्यांसाठी  विश्रांती आणि अल्पोपहाराची पुरेशी सुविधा देखील उपलब्ध करतील

 

* * *

S.Tupe/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1707377) Visitor Counter : 139