ऊर्जा मंत्रालय

पॉवरग्रीड कंपनीने “प्रणित” या प्रमाणित ई-निविदा पोर्टल सुविधेची सुरुवात केली

Posted On: 23 MAR 2021 2:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 मार्च 2021

केंद्रीय उर्जा मंत्रालयाच्या अखत्यारीतील केंद्र सरकारचा सार्वजनिक उपक्रम असलेल्या पॉवरग्रीड या कंपनीने ई-निविदा प्रक्रियेसाठी प्रणित या नव्या पोर्टलची स्थापना केली आहे. या पोर्टलमुळे, निविदा प्रक्रियेत आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांचे प्रमाण कमी होईल आणि निविदा भरण्यात अधिक सुलभता आल्यामुळे निविदा प्रक्रिया जास्त पारदर्शक होईल. हे पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या एसटीक्यूसी अर्थात मानकीकरण, तपासणी तसेच दर्जा प्रमाणीकरण संचालनालयाने प्रमाणित केलेले आहे.

हे पोर्टल सुरु करून पॉवरग्रीड कंपनी आता सुरक्षा आणि पारदर्शकते बाबत एसटीक्यूसीने घालून दिलेल्या सर्व गरजांची पूर्तता करणारी आणि ई-खरेदी व्यवहारासाठी एसएपी-एसआरएम अर्थात पुरवठादार संबंधी व्यवस्थापनावर आधारित असलेली भारतातील एकमेव संस्था ठरली आहे. परिचालनातील विविध प्रक्रियांचे डिजीटलायझेशन करण्यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून पॉवरग्रीड कंपनी एसएपी-एसआरएम चौकटीअंतर्गत अनेक नाविन्यपूर्ण सुधारणात्मक उपक्रम हाती घेत आहे.

 

S.Tupe/S.Chitnis/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1706889) Visitor Counter : 103