सांस्कृतिक मंत्रालय
सन 2020 साठीचा गांधी शांतता पुरस्कार जाहीर
Posted On:
22 MAR 2021 6:24PM by PIB Mumbai
सन 2020 साठीचा गांधी शांतता पुरस्कार बंगबंधु शेख मुजीबुर रहमान यांना जाहीर करण्यात आला आहे. गांधी शांतता पुरस्कार, 1995 पासून भारत सरकारतर्फे दरवर्षी दिला जातो. महात्मा गांधीजींचे यंदा 125 वे जयंती वर्ष आहे. राष्ट्रीयत्व, वंश, भाषा, जाती, धर्म किंवा लिंग असा कोणताही भेद न करता सर्व व्यक्तींसाठी हा पुरस्कार खुला आहे.
गांधी शांतता पुरस्कारा साठीच्या निवड समितीचे अध्यक्ष माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्याचबरोबर दोन माजी वरिष्ठ पदाधिकारी, यात सरन्यायाधीश आणि लोकसभेतील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचे नेते यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आणि सुलभ आंतरराष्ट्रीय समाजसेवा संस्थेचे संस्थापक बिंदेश्वर पाठक हे दोन प्रमुख मान्यवर सदस्य या मंडळाचे सदस्य आहेत.
निवड समिती सदस्यांची 19 मार्च 2021 रोजी बैठक झाली आणि विचारविनिमयानंतर एकमताने बंगबंधु शेख मुजीबुर रहमान यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. गांधींजींनी दाखवलेल्या अहिंसा आणि इतर मार्ग, पद्धतींच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तनासाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी बंगबंधु शेख मुजीबुर रहमान यांना सन 2020 साठी गांधी शांती पुरस्कार जाहीर झाला आहे.
रुपये एक कोटी, प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह आणि उत्कृष्ट पारंपारिक हस्तकला भेट हे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे की वंगबंधु मानवाधिकार आणि स्वातंत्र्याचे विजेते होते आणि भारतीयांचे देखील ते नायक होते.
S.Tupe/S.Patgoankar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1706697)
Visitor Counter : 1883