संरक्षण मंत्रालय

भारतीय लष्कराला 4,960 अँटी-टँक गाईडेड क्षेपणास्त्रचा पुरवठा करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाचा बीडीएल सोबत करार

Posted On: 19 MAR 2021 9:03PM by PIB Mumbai

 

संरक्षण मंत्रालयाच्या खरेदी (अधिग्रहण) विभागाने, भारतीय लष्कराला 4,960 एमआयएलएएन-2टी अँटी-टँक गाईडेड क्षेपणास्त्र (एटीजीएम) चा पुरवठा करण्यासाठी संरक्षण मंत्रालया अंतर्गत कार्यरत भारत डायनामिक्स लिमिटेड (बीडीएल) या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीसोबत 1,188 कोटी रुपयांच्या करारावर 19 मार्च 2021 रोजी नवी दिल्ली येथे स्वाक्षरी केली. यामुळे सरकारच्या मेक इन इंडियाउपक्रमाला अधिक चालना मिळेल. 08 मार्च, 2016 रोजी बीडीएल सोबत स्वाक्षरी केलेल्या करारा अंतर्गत ही ऑर्डर पुन्हा देण्यात आली आहे. 

मिलान -2 टी ही एक 1,850 मीटर मारक क्षमता असलेली टँडम वॉरहेड एटीजीएम आहे. बीडीएलने एमबीडीए क्षेपणास्त्र प्रणाली, फ्रान्सच्या परवान्याअंतर्गत हिची निर्मिती केली आहे. हे क्षेपणास्त्र जमिनीवरून तसेच वाहनांवर आधारित लाँचर्सवरून मारा करू शकतात आणि चढाई आणि बचावात्मक दोन्ही कामांसाठी अँटी-टँक रोलमध्ये तैनात केले जाऊ शकतात. भारतीय लष्करात या क्षेपणास्त्रांचा समावेश केल्यास सशस्त्र दलाच्या कार्यवाहीला  अधिक बळकटी प्राप्त होईल. तीन वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

हा प्रकल्प म्हणजे संरक्षण उद्योगासाठी आपली क्षमता दर्शविण्याची एक मोठी संधी असून संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भर भारतचे लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने हे एक पाऊल असेल.

****

M.Chopade/S.Mhatre/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1706162) Visitor Counter : 187