निती आयोग
एकरेषीय ते चक्रीय अर्थव्यवस्थेपर्यंतच्या संक्रमणाच्या दिशेने सरकारची जोमाने वाटचाल
Posted On:
18 MAR 2021 9:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 मार्च 2021
आत्मनिर्भर भारताची गुरुकिल्ली म्हणजे शाश्वत विकास . स्रोतांचा उत्कृष्ट वापर करणारे विकास मॉडेल विकसित करणे ही काळाची गरज आहे.वाढती लोकसंख्या, गतिमान शहरीकरण, हवामान बदल आणि पर्यावरण प्रदूषण यामुळे भारताने चक्रीय अर्थव्यवस्थेकडे वाटचाल केली पाहिजे.
आर्थिक दृष्टीकोनातून, कचरा निर्मूलन आणि संसाधनांचा सतत वापर करण्याच्या उद्देशाने, उत्पादने आणि प्रक्रियेसंदर्भातील सर्वसमावेशक दृष्टीकोनाच्या गरजेवर भर देण्यासाठी चक्रीय अर्थव्यवस्था नवे प्रतिमान देते.
भारताने स्वीकारलेल्या चक्रिय अर्थव्यवस्थेचा मार्ग, गर्दी आणि प्रदूषणात लक्षणीय घट करण्यासह शाश्वत वार्षिक फायदे मिळवून देऊ शकतो आणि याचा अर्थव्यवस्थेवर झपाट्याने परिणाम होईल.
देशाला चक्रीय अर्थव्यवस्थेकडे नेण्यासाठी सरकार सक्रियपणे धोरणे आखून प्रकल्पांना चालना देत आहे. या दृष्टीनें , प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम, ई-कचरा व्यवस्थापन नियम, बांधकामी आणि पाडलेल्या बांधकामातून निर्माण झालेला कचरा व्यवस्थापन नियम, धातू पुनर्वापराचे धोरण इ. यांसारख्या विविध नियमांना यापूर्वीच अधिसूचित केले गेले आहे.
स्थापना झाल्यापासून नीती आयोगानेही शाश्वत आर्थिक विकासासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. कचर्याचा स्रोत म्हणून वापर करण्याच्या आणि भारतातील पुनर्वापर उद्योगाविषयी दृष्टीकोन विकसित करण्याबाबतच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी थेट पुढाकार घेण्यात आला.
देशाचे एकरेषीय अर्थव्यवस्थेपासून चक्रीय अर्थव्यवस्थेपर्यंतचे संक्रमण वेगवान करण्याच्या दृष्टीने, लक्ष केंद्रित केलेल्या 11 क्षेत्रांची माहिती परिशिष्ट 1 मध्ये दिली आहे.
11 समित्या स्थापन केल्या आहेत. त्यांचे नेतृत्व संबंधित मंत्रालये, पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालय आणि नीती आयोगाचे अधिकारी, संबंधित कार्यक्षेत्रातील तज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योग प्रतिनिधी यांच्याकडे आहे. एकरेषीय अर्थव्यवस्थेपासून चक्रीय अर्थव्यवस्थेपर्यंत संक्रमण करण्याच्या दृष्टीने संबंधित क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी, या समित्या सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करतील. या समित्यांचे निष्कर्ष आणि शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक कार्यप्रणाली पार पाडतील.
लक्ष केंद्रीत केलेल्या 11क्षेत्रांमध्ये मृत उत्पादने / पुनर्वापरयोग्य साहित्य /कचरा समाविष्ट आहे. या क्षेत्रात मोठी आव्हाने उभी ठाकली आहेत किंवा नवीन आव्हानात्मक क्षेत्र म्हणून उदयाला येत आहेत, त्यांच्याकडे समग्र दृष्टीकोनातून पाहायला हवे.
परिशिष्ट 1
S. No.
|
Focus Area
|
Concerned Line Ministry
|
1
|
Municipal Solid Waste and Liquid Waste
|
Ministry of Housing and Urban Affairs
|
2
|
Scrap Metal (Ferrous and Non-Ferrous)
|
Ministry of Steel
|
3
|
Electronic Waste
|
Ministry of Electronics and Information Technology
|
4
|
Lithium Ion (Li-ion) Batteries
|
NITI Aayog
|
5
|
Solar Panels
|
MNRE
|
6
|
Gypsum
|
Department for Promotion of Industry and Internal Trade
|
7
|
Toxic and Hazardous Industrial Waste
|
Department of Chemicals and Petrochemicals
|
8
|
Used Oil Waste
|
Ministry of Petroleum and Natural Gas
|
9
|
Agriculture Waste
|
Ministry of Agriculture and Farmers’ Welfare
|
10
|
Tyre and Rubber Recycling
|
Department for Promotion of Industry and Internal Trade
|
11
|
End-of-life Vehicles (ELVs)
|
Ministry of Road Transport and Highways
|
* * *
Jaydevi PS/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1705900)
Visitor Counter : 305