आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

वैद्यकीय गर्भपात (सुधारणा) विधेयक 2021 राज्यसभेत मंजूर

Posted On: 17 MAR 2021 3:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 मार्च 2021

 

राज्यसभेने 16 मार्च 2021 रोजी वैद्यकीय गर्भपात कायदा 1971 मध्ये सुधारणा करणाऱ्या वैद्यकीय गर्भपात (सुधारणा) विधेयक  2021 ला मान्यता दिली. हे विधेयक लोकसभेत 17 मार्च 2020 रोजी संमत झाले होते.

विधेयकाची ठळक वैशिष्ट्ये:

  • विशेष श्रेणी महिलांसाठी गर्भपाताच्या मुदतीची मर्यादा  20 वरून 24 आठवडे करणे, या महिलांमध्ये बलात्कार पिडीत महिला, दिव्यांग महिला, अल्पवयीन यासह  इतर महिलांचा समावेश राहील.
  • गर्भावस्थेच्या  20 आठवड्यापर्यंत गर्भपात करण्यासाठी एका डॉक्टरचा आणि गर्भावस्थेच्या 20 ते 24 आठवड्यापर्यंत गर्भपात करण्यासाठी दोन डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक राहील.
  • वैद्यकीय मंडळाद्वारे निदान झालेल्या गर्भाच्या विकृतींच्या बाबतीत गर्भपाताची कमाल मर्यादा लागू होत नाही. वैद्यकीय मंडळाची रचना, कार्ये आणि इतर तपशील अधिनियमांतर्गत नियमांमध्ये नंतर विहित केल्या पाहिजेत.
  • गर्भपात करणाऱ्या महिलेचे नाव आणि इतर माहिती, कायद्याने अधिकार दिलेल्या व्यक्ती खेरीज इतर कोणत्याही व्यक्तीला दिली जाणार नाही.
  • गर्भनिरोधकांच्या अपयशाचे क्षेत्र स्त्रिया आणि त्यांच्या जोडीदारापर्यंत वाढविण्यात आले आहे.

वैद्यकीय गर्भपात (सुधारणा) विधेयक 2021 हे महिलांसाठी सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपात सेवेचा विस्तार करण्यासाठी, उपचारात्मक,मानवी आणि सामाजिक आधारावर आणण्यात येत आहे.

कठोर अटींखाली सेवा आणि सुरक्षित गर्भपात गुणवत्तेशी तडजोड न करता काही परिस्थितीत गर्भपाताची कमाल मर्यादा वाढवण्यासाठी तसेच गर्भपात सेवेतील सर्वसमावेशक प्रवेश मजबूत करण्याच्या उद्देशाने या अटींमध्ये काही उप-कलमांना पर्यायी कलमे देणे, सध्याच्या वैद्यकीय गर्भपात कायदा 1971मधील काही कलमांतर्गत काही नवीन कलमे समाविष्ट करणे यांचा समावेश आहे.

महिलांची सुरक्षा आणि आरोग्याच्या दृष्टीने उचलण्यात आलेले हे  ठोस  पाउल असून त्याचा अनेक महिलांना लाभ होईल. स्त्रियांवरील लैंगिक अत्याचारामुळे होणाऱ्या गर्भधारणा किंवा गर्भाच्या विकृतीच्या कारणास्तव सध्याच्या गर्भपाताची कमाल मर्यादा वाढविण्याबाबत अलीकडेच न्यायालयाला अनेक याचिका प्राप्त झाल्या आहेत. या सुधारणांमुळे महिलांना सुरक्षित गर्भपात सेवेची महत्वाकांक्षा व प्रवेश वाढेल आणि ज्या महिलांना गर्भपाताची आवश्यकता आहे त्यांना सन्मान, स्वायत्तता, गोपनीयता आणि न्याय मिळेल.

 

 

Jaydevi PS/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1705447) Visitor Counter : 6105