शिक्षण मंत्रालय

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी ऑनलाईन शिक्षक विद्यार्थी नोंदणी व्यवस्थापन प्रणाली (ओटिपीआरएमएस) प्रमाणपत्र डिजिलॉकरशी जोडून नोंदणीशुल्क पूर्णपणे माफ केल्याची केली घोषणा

Posted On: 14 MAR 2021 2:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 मार्च 2021

ऑनलाईन शिक्षक विद्यार्थी नोंदणी व्यवस्थापन प्रणाली (OTPRMS) द्वारे प्रमाणपत्र सत्यापित करण्याच्या त्रासापासून सुटका होण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने ही प्रमाणपत्रे डिजीलॉकरशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे अशी घोषणा  केंद्रीय शिक्षणमंत्री श्री. रमेश पोखरीवाल नि:शंक यांनी केली . जारी झालेली प्रमाणपत्रे ताबडतोब डिजीलाँकरमधे हस्तांतरीत केली जातील आणि ती या राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परीषदेच्या (NCTE) at https://ncte.gov.in/website/DigiLocker.aspx and DigiLocker at https://digilocker.gov.in/.DigiLocker App संकेतस्थळावरून पाहता येऊ शकतील. अँड्रॉइड फोनवरून अथवा आयफोन वरून  डिजीलॉकर ॲप डाऊनलोड करता येईल. 

राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परीषद जारी करत असलेले  ओटीपीआरएमएस प्रमाणपत्र मिळविण्यासाठी  आकारण्यात येत असलेले 200 रुपये शुल्क माफ केले आहे ,असे मंत्रीमहोदयांनी असेही जाहीर केले आहे.यामुळे संपूर्ण भारतभरातील हितसंबंधितांना  ईझ ऑफ डुईंग बिझनेसचे सुलभीकरण करत  डिजीटली सक्षम करण्यात येईल. 

 

 

Jaydevi PS/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1704705) Visitor Counter : 224