रेल्वे मंत्रालय
कोविड आव्हान असूनही 11 मार्च 2021 रोजी भारतीय रेल्वेने एकूण 1145.68 दशलक्ष टन मालवाहतूक केली जी मागील वर्षाच्या एकूण मालवाहतुकीच्या (1145.61 दशलक्ष टन) तुलनेत जास्त आहे
Posted On:
12 MAR 2021 6:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 मार्च 2021
कोविड आव्हान असूनही 11 मार्च 2021 रोजी भारतीय रेल्वेने गत वर्षाच्या एकूण मालवाहतुकीचा आकडा पार केला.
11 मार्च 2021 रोजी भारतीय रेल्वेच्या एकूण मालवाहतुकीचे प्रमाण 1145.68 दशलक्ष टनांपर्यंत पोहोचले जे मागील वर्षाच्या (1145.61 दशलक्ष टन) एकूण मालवाहतुकी पेक्षा जास्त आहे.
सर्वाधिक नमूद करण्याची बाब म्हणजे रेल्वे मालवाहतूक अत्यंत आकर्षक करण्यासाठी भारतीय रेल्वेमध्ये बरीच सूट / सवलती सुद्धा दिल्या जात आहेत. परिमंडळ आणि विभागातील व्यवसाय विकास युनिटचा जोरदार उदय, उद्योग क्षेत्राशी नियमित संवाद आणि मालवाहतूक सेवा प्रदाते आणि जलद गतीमुळे रेल्वेच्या मालवाहू व्यवसायाची भरघोस वाढ होत आहे.
भारतीय रेल्वेने अष्टपैलू कार्यक्षमता आणि कामगिरी सुधारण्याची संधी म्हणून कोविड 19 चा वापर केला आहे याची नोंद घ्यावी लागेल.
* * *
M.Chopade/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1704428)
Visitor Counter : 280