सांस्कृतिक मंत्रालय

‘आजादी का अमृत महोत्सव’ हा जन महोत्सव ठरेल : प्रल्हाद सिंह पटेल

Posted On: 12 MAR 2021 6:52PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 मार्च 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबाद इथे साबरमती आश्रमातून पदयात्रेला ( स्वातंत्र्य यात्रा ) हिरवा झेंडा दाखवला. ‘आजादी का अमृत महोत्सव’ India@75 साठीच्या कार्यक्रमांचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले. India@75 साठी विविध सांस्कृतिक आणि डिजिटल उपक्रमांचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि गांधी आश्रमाचे विश्वस्त या कार्यक्रमाला उपस्थित होते.

साबरमती आश्रम इथे उपस्थिताना संबोधित करताना ‘आजादी का अमृत महोत्सव’ या 15 ऑगस्ट 2022 पूर्वी 75 आठवडे सुरु होणाऱ्या  आणि 15 ऑगस्ट 2023 पर्यंत सुरु राहणाऱ्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाचा त्यांनी उल्लेख  केला. स्वातंत्र्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या महात्मा गांधी आणि महान स्वातंत्र्य सैनिकांना पंतप्रधानांनी आदरांजली अर्पण केली.

स्वप्ने आणि कर्तव्ये यांची पूर्तता करताना प्रेरणा म्हणून स्वातंत्र्य लढा, 75 साठी कल्पना, 75 साठी कामगिरी, 75 साठी कृती, 75 साठी संकल्प या पाच स्तंभाचा मार्गदर्शक म्हणून त्यांनी पुनरुच्चार केला.

आजादी का अमृत महोत्सव म्हणजे स्वातंत्र्याच्या उर्जेचे अमृत, स्वातंत्र्य लढ्याच्या योद्ध्यांच्या स्फूर्तीचे , नव कल्पना आणि आत्मनिर्भरता आणि नव संकल्पांचे अमृत असे पंतप्रधानानी सांगितले.

सविस्तर प्रसिद्धी पत्रकासाठी इथे क्लिक करा: 

https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1704323

सविस्तर प्रसिद्धी पत्रकासाठी इथे क्लिक करा:

https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1704336

गांधीजीनी दांडीयात्रा सुरु केली त्या भूमीवर  91 वर्षानंतर आपण सर्व जण जमलो आहोत. मात्र आताचा भारत हा पूर्णतः परिवर्तन घडलेला भारत आहे.भारताचा विकासाचा प्रवास हा स्वयंपूर्ण आणि आत्म सन्मानाचा असेल या पंतप्रधानांच्या वक्तव्याचे स्मरण केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांनी केले. जागतिक मंचावर योगदान देणारा देश अशी आपली प्रतिमा राहील.आजादी का अमृत महोत्सव हा जन महोत्सव राहील असे सांगून जनतेच्या रुचीचे कार्यक्रम यात आयोजित केले जातील असे ते म्हणाले.

आपल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाची सुरवात गुजरातच्या भूमीवरून केल्या बद्दल गुजरातचे मुख्यमंत्री  विजय रूपाणी यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.

India@75 या संकेत स्थळाचे उद्घाटन आणि  ‘आत्मनिर्भर इनक्युबेटर’ कार्यक्रमाचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले.कारागीरांच्या लोप पावत असलेल्या कला आणि कौशल्यांचे जतन करण्यासाठी साबरमती आश्रमाच्या भागीदारीने सांस्कृतिक मंत्रालयाने हा कार्यक्रम हाती घेतला आहे.

भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे  साजरी करण्यासाठी केंद्र सरकारने आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांची  मालिका आयोजित केली आहे. देशभरात जन-सहकार्याच्या भावनेतून जन-उत्सव म्हणून हा महोत्सव साजरा केला जाईल.

 

* * *

M.Chopade/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1704425) Visitor Counter : 751