रेल्वे मंत्रालय
भारतीय रेल्वेकडून ई-एप्लीकेशन श्रमिक कल्याण पोर्टलच्या माध्यमातून कंत्राटी कामगारांच्या किमान वेतनाच्या हमीचे 100% अनुपालन
रेल्वे मंत्रालया अंतर्गत काम करणाऱ्ऱ्या सर्व सार्वजनिक उपक्रमांकडूनही ई- एप्लीकेशनचा वापर
कंत्राटदारांकडून कंत्राटी कामगारांना देण्यात येणाऱ्या वेतनावर लक्ष ठेवण्यासाठी ई-एप्लीकेशन द्वारे रेल्वेला साहाय्य
Posted On:
11 MAR 2021 3:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 मार्च 2021
भारतीय रेल्वे श्रमिक कल्याण ई-अॅप्लिकेशन विकसित करण्यात आले असून 1 ऑक्टोबर, 2018 रोजी त्याचा प्रारंभ झाला आहे. किमान वेतन कायद्याच्या तरतुदींचे पालन केले जात आहे की नाही हे पाहणे ई-अॅप्लिकेशनमुळे शक्य होत आहे. भारतीय रेल्वेत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कंत्राटदारांकडून त्यांचे हक्काचे वेतन मिळावे यासाठी ई-अॅप्लिकेशनमध्ये कंत्राटदारांनी नियमितपणे वेतन देय आकडेवारी भरणे बंधनकारक आहे. यामुळे प्रधान नियोक्ता असलेल्या रेल्वेला, कंत्राटदारांकडून कंत्राटी कामगारांना देण्यात येणाऱ्या वेतनावर लक्ष ठेवण्यासाठीमदत होते .
दिनांक 09.03.2021पर्यंतच्या नोंदीनुसार या पोर्टलवर एकूण 15,812 कंत्राटदार आणि एकूण 3,81,831 कंत्राटी कामगार नोंदणीकृत आहेत. यासह, एकूण 4815,812,312 स्वीकृतीपत्र , 349590 लाख रुपये ( 3495 कोटी रुपयांहून अधिक) वेतन रक्कम आणि सुमारे सहा कोटी मनुष्य दिवसदेखील या पोर्टलवर नोंदले गेले आहेत.
रेल्वे मंत्रालयाअंतर्गत असलेले सर्व सार्वजनिक उपक्रमदेखील ई- अॅप्लिकेशनचा वापर करत आहेत.
पोर्टलमुळे रेल्वेच्या वेगवेगळ्या एककांच्या सर्व कंत्राटदारांना म्हणजेच विभाग / कारखाने /पीयू / सार्वजनिक क्षेत्र उपक्रम यांना ई- अॅप्लिकेशनवर नावनोंदणी करता येते आणि त्यानंतर वेगवेगळ्या रेल्वे एककाद्वारे जारी वर्क ऑर्डर त्यांना जोडता येतात. कंत्राटदारांना त्यांच्याकडे कामासाठी असलेल्या प्रत्येक कंत्राटी कामगारांचे प्रोफाइल तयार करावे लागतात आणि त्याला देण्यात येणाऱ्या वेतनाची माहिती नियमितपणे अद्ययावत ठेवावी लागते.
ई-अॅप्लिकेशनमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्याचा आयडी तयार करण्याची तसेच त्याला देण्यात आलेले वेतन, ईपीएफ आणि ईएसआयसीसाठी झालेले योगदान या बद्दल वेळोवेळी एसएमएस पाठविण्याची तरतूद उपलब्ध आहे.
Jaydevi PS/S.Kulkarni/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1704126)
Visitor Counter : 243