अर्थ मंत्रालय

स्टँड अप योजनेला आरंभ झाल्यापासून 1,10,019 पेक्षा अधिक कर्जाचे वितरण

Posted On: 09 MAR 2021 5:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 मार्च 2021

‘स्टँड अप योजने’ला  आरंभ झाला तेव्हापासून दिनांक 31.01.2021 पर्यंत  1,10,019 पेक्षा अधिक कर्जाचे वितरण झाले आणि लाभार्थ्यांना त्यांचा व्यवसाय वाढविण्यासाठी 10 लाखांपासून ते 1 कोटी रुपयापर्यंत कर्ज वितरित केले गेले आहे.

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री श्री. अनुराग सिंग ठाकूर यांनी आज राज्यसभेत एका  प्रश्नाचे लिखित उत्तर देताना ही माहिती दिली .

स्टँड अप इंडिया या  योजनेचा  दिनांक 5 एप्रिल 2016 रोजी आरंभ झाला आणि त्यानंतर ही योजना 2025 पर्यंत वाढविण्यात आली.या योजनेअंतर्गत  10 लाख ते 1कोटी रुपये पर्यंत कर्ज अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीतील कमीत कमी एका कर्जदाराला आणि कमीत कमी एका महिला कर्जदाराला प्रत्येक शेड्यूल्ड कमर्शियल  बँकेची शाखा (SCBs) उत्पादन सेवा अथवा व्यापारातील हरीत उपक्रमासाठी  (ग्रीनफिल्ड एन्टरप्राईझेस)कर्जाचे वितरण करते .

 

Jaydevi PS/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1703547) Visitor Counter : 119