निती आयोग
नीती आयोग 10 मार्च 2021 रोजी एसडीजी इंडिया इंडेक्स आणि डॅशबोर्ड 2020-21 प्रकाशित करणार
Posted On:
08 MAR 2021 4:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 मार्च 2021
भारताच्या शाश्वत विकास उद्दिष्ट (एसडीजी) निर्देशांकची तिसरी आवृत्ती 10 मार्च 2021 रोजी नीती आयोगामार्फत प्रकशित केली जाईल. डिसेंबर 2018 मध्ये पहिली आवृत्ती प्रकाशित करण्यात आली होती. हा निर्देशांक देशातील एसडीजी प्रगतीवर देखरेख ठेवण्याचे प्राथमिक साधन बनले आहे आणि त्याचबरोबर याने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील स्पर्धेला चालना दिली आहे. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे सचिव डॉ. के. शिवाजी आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ राजीव कुमार हे एसडीजी इंडिया इंडेक्स आणि डॅशबोर्ड 2020-21 प्रकाशित करतील.
एसडीजी इंडिया इंडेक्स आणि डॅशबोर्ड, 2020-21 : पार्टनरशिप इन द डीकेड ऑफ ऍक्शन
हा निर्देशांक जागतिक उद्दिष्टे व लक्ष्य पूर्ण करण्याच्या दिशेने देशाच्या राष्ट्रीय आणि उप-राष्ट्रीय पातळीवरील प्रगतीचे मोजमाप करतो. आपण 2030 कार्यसूची साध्य करण्याच्या प्रवासाचा एक तृतीयांश टप्पा पूर्ण केला असून निर्देशांकाच्या अहवालाची ही आवृत्ती भागीदारीच्या महत्वावर केंद्रित आहे आणि त्याचे “एसडीजी इंडिया इंडेक्स आणि डॅशबोर्ड: पार्टनरशिप इन द डीकेड ऑफ ऍक्शन असे शीर्षक आहे.
प्रत्येक आवृत्तीसह हे महत्त्वपूर्ण साधन अधिक अद्ययावत आणि सुधारित करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे, ज्यायोगे सतत बेंचमार्कची कार्यक्षमता आणि प्रगतीचे मोजमाप करण्याची आणि राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांवरील एसडीजी संबंधित अद्ययावत डेटाची उपलब्धता गरजेची आहे. सन 2018-19 मधील पहिल्या आवृत्तीतील 13 उद्दिष्टे, 39 लक्ष्य आणि 62 सूचकांक, दुसऱ्यामध्ये 17 उद्दिष्टे, 54 लक्ष्य आणि ₹100 सूचकांक तर तिसऱ्या आवृत्तीमध्ये 17 उद्दिष्टे, 70 लक्ष्य आणि 115 सूचकांकांचा समावेश आहे.
S.Tupe/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1703200)
Visitor Counter : 599