अर्थ मंत्रालय

स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत 81% हून अधिक खातेदार या महिला

मुद्रा: या योजनेत 68% कर्ज खाती महिला उद्योजकांची

Posted On: 08 MAR 2021 9:06AM by PIB Mumbai

अर्थ मंत्रालयाने गेल्या सात वर्षात महिला सक्षमीकरणासाठी विशेष तरतुदी असलेल्या विविध योजना सुरू केल्या आहेत. या योजनांनी महिलांना चांगले जीवन जगण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम केले आहे आणि उद्योजक होण्याच्या त्यांच्या स्वप्नांची पूर्तता केली आहे.

आज 8 मार्च 2021 रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करत असताना, महिलांना फायदेशीर ठरलेल्या अर्थ मंत्रालयाच्या विविध योजनांचा आढावा घेऊया 

स्टँड-अप इंडिया योजना - तळागाळातील स्तरावर उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी 5 एप्रिल 2016 रोजी स्टँड अप इंडिया योजना सुरू केली गेली.स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत 26.02.2021 पर्यंत, 81% पेक्षा जास्त म्हणजेच 91,109 महिला उद्योजकांच्या खात्यात 20,749 कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

प्रधान मंत्री मुद्रा योजना (पीएमएमवाय) - 8 एप्रिल, 2015 रोजी बिगर कॉर्पोरेट, बिगर-शेती लघु / सूक्ष्म उद्योगांना 10 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी प्रधान मंत्री मुद्रा योजना सुरू करण्यात आली. योजना सुरु झाल्यापासून 26.02.2021 पर्यंत सुमारे 68% म्हणजेच 19.04 कोटी महिला उद्योजकांसाठी 6.36 लाख कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

पंतप्रधान जन-धन योजना (पीएमजेडीवाय) - पीएमजेडीवाय ने प्रत्येक घरातील, आर्थिक साक्षरता, पत, विमा आणि निवृत्तीवेतन यासाठी किमान एक मूलभूत बँकिंग खाते असलेल्या बँकिंग सुविधांमध्ये सार्वत्रिक प्रवेशाची कल्पना केली आहे. या योजनेअंतर्गत 24.02.2021 पर्यंत उघडण्यात आलेल्या एकूण 41.93 कोटी खात्यांपैकी 23.21 कोटी महिला खातेदार आहेत.

*****

M.Chopade/ Vasanti/ CY

****

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1703131) Visitor Counter : 17