शिक्षण मंत्रालय
राष्ट्रीय मुक्त शिक्षण संस्थेकडून स्पष्टीकरण
Posted On:
03 MAR 2021 2:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 मार्च 2021
टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रात दिनांक 03.03.2021 रोजी प्रकाशित झालेल्या ‘राष्ट्रीय मुक्त शिक्षण संस्था (NIOS) गीता, रामायण मदरशांपर्यंत पोहोचवणार’ या बातमीसंदर्भात हे स्पष्टीकरण देण्यात येत आहे. हे वृत्तांकन सद्यस्थितीचे विकृतीकरण आणि सत्याचा अपलाप करणारे, द्वेषपूर्ण हेतूने केल्याचे स्पष्ट आहे.
राष्ट्रीय मुक्त शिक्षण संस्था मदरशांना त्यांच्या गुणवत्तेनुसार (SPQEM)मान्यता देते.या द्वारे औपचारिक शिक्षण व्यवस्थेतील निश्चित विषयांच्या व्यतिरिक्त अनेक विषय कठोर नियम लागू न करता मुलांना शिकविले जातात.यासाठी उपलब्ध केलेल्या विषयांतून एखाद्या विषय गटाची निवड करणे,हा त्या विद्यार्थ्याचा स्वताचा निर्णय असतो.
राष्ट्रीय मुक्त शिक्षण संस्थेने अशा 100 मदरशांना मान्यता दिली आहे, ज्यात 50,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याव्यतिरिक्त येणाऱ्या काळात अशा आणखी 500 मदरशांना मागणीनुसार मान्यता देण्याची योजना आहे.
* * *
Jaydevi PS/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1702197)
Visitor Counter : 305