आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
महाराष्ट्र, केरळ, पंजाब, तामिळनाडू, गुजरात आणि कर्नाटकमध्ये दैनंदिन नवीन रुग्णसंख्येत वाढ
आज सकाळी 7 पर्यंत 1.56 कोटी पेक्षा जास्त लसींचे डोस दिले
Posted On:
03 MAR 2021 2:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 मार्च 2021
महाराष्ट्र, केरळ, पंजाब, तामिळनाडू, गुजरात आणि कर्नाटकमध्ये कोविडच्या दैनंदिन रुग्णांच्या आकड्यामध्ये वाढ नोंदविली जात आहे. गेल्या 24 तासांत नोंदवलेल्या नवीन रुग्णांपैकी 85.95% रुग्ण या राज्यातील आहेत.
गेल्या 24 तासांत 14,989 नवीन रुग्णांची नोंद झाली झाले. महाराष्ट्रात सर्वाधिक 7,863 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्याखालोखाल केरळमध्ये 2,938 तर पंजाबमध्ये 729 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
आठवड्याच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश, दिल्ली, हरियाणा आणि कर्नाटकमध्ये नवीन रुग्ण संख्येत सर्वाधिक वाढ झाली आहे.
एकट्या महारष्ट्रात आठवड्याभरात 16,012 रुग्णांची वाढ झाली आहे.
टक्केवारीनुसार पंजाबमध्ये आठवड्यात 71.5% (1,783 रुग्ण) रुग्णांची वाढ झाली आहे.
सक्रिय रुग्णांचे प्रमाण वाढत असलेल्या आणि दररोज नवीन कोविड रुग्णांची नोंद होणाऱ्या राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांसोबत केंद्र सरकार सतत संपर्कात आहे. कोविड -19 च्या सध्या वाढत असलेल्या रुग्ण संख्येवर नियंत्रण आणायला मदत करण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, मध्यप्रदेश, गुजरात, पंजाब, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि जम्मू-काश्मीर येथे उच्चस्तरीय पथके रवाना केली आहेत. या तीन सदस्यीय पथकाचे नेतृत्व आरोग्य मंत्रालयात सह-सचिव स्तरावरील अधिकारी करतील. हे पथक कोविड-19 च्या वाढत्या रुग्ण संख्येची कारणे शोधतील आणि कोविड-19 वर नियंत्रण आणि प्रतिबंधासाठी राज्य आरोग्य विभागांशी समन्वय साधतील.
भारतातील एकूण सक्रीय रुग्ण संख्या आज 1,70,126 वर पोहोचली आहे. भारतातील सध्याच्या सक्रिय रुग्णांचे प्रमाण हे भारताच्या एकूण बाधित रुग्णांच्या 1.53% आहे.
खालील आलेख गेल्या 24 तासात राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या सक्रिय रुग्ण संख्येतील बदल दर्शवितो. केरळ, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या 24 तासांत सक्रिय रुग्ण संख्येत घट दिसून येत आहे, तर त्याच काळात महाराष्ट्र, पंजाब, दिल्ली, कर्नाटक आणि गुजरातमध्ये सक्रिय रुग्ण संख्येत वाढ दिसून आली आहे.
ज्या लाभार्थ्यांना पहिला डोस घेऊन 28 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे अशा लाभार्थ्यांना कोविड-19 लसीकरणाचा दुसरा डोस 13 फेब्रुवारी, 2021 पासून देण्यास सुरुवात झाली आहे. एफएलडब्ल्यूचे लसीकरण 2 फेब्रुवारी 2021 रोजी सुरू झाले.
60 वर्षापेक्षा अधिक वय असलेले नागरिक आणि सह-आजार असलेले 45 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांसाठी कोविड-19 लसीकरणाचा पुढील टप्पा 1 मार्च 2021 पासून सुरु झाला आहे.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार 3,12,188 सत्रांद्वारे 1.56 कोटी (1,56,20,749) पेक्षा जास्त लसींचे डोस दिले आहेत. यामध्ये 67,42,187 एचसीडब्ल्यू (1 ला डोस), 27,13,144 एचसीडब्ल्यू (2 रा डोस), 55,70,230 एफएलडब्ल्यू (1 ला डोस) आणि 834 एफएलडब्ल्यू (दुसरा डोस), विशिष्ट सह-आजार असेलेले 45 वर्षांवरील 71,896 लाभार्थी (पहिला डोस) आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील 5,22,458 लाभार्थी (पहिला डोस) समाविष्ट आहेत.
HCWs
|
FLWs
|
45 to <60 years with Co-morbidities
|
Over 60 years
|
Total
|
1st Dose
|
2nd Dose
|
1st Dose
|
2nd Dose
|
1st Dose
|
1st Dose
|
67,42,187
|
27,13,144
|
55,70,230
|
834
|
71,896
|
5,22,458
|
1,56,20,749
|
लसीकरण मोहिमेच्या (दि. 2 मार्च 2021) या 46 व्या दिवसापर्यंत एकूण 7,68,730 लस डोस देण्यात आले. त्यापैकी 6,52,501 लाभार्थ्यांना 10,527 सत्रांमध्ये पहिला डोस (एचसीडब्ल्यू आणि एफएलडब्ल्यू) देण्यात आला आणि 1,16,229 एचसीडब्ल्यू आणि एफएलडब्ल्यूंना लसचा दुसरा डोस देण्यात आला.
Date: 2nd March, 2021
|
HCWs
|
FLWs
|
45 to <60 years with Co-morbidities
|
Over 60years
|
Total Achievement
|
1stDose
|
2ndDose
|
1stDose
|
2nd Dose
|
1stDose
|
1stDose
|
1stDose
|
2ndDose
|
37656
|
115395
|
227762
|
834
|
47617
|
339466
|
652501
|
116229
|
आतापर्यंत 1.08 कोटी (1,08,12,044) पेक्षा अधिक लोक बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 13,123 रूग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
नवीन रुग्णांपैकी 86.58% रुग्ण सहा राज्यातील आहेत.
महाराष्ट्रात सर्वाधिक 6332 रुग्ण एका दिवशी बरे झाले. गेल्या 24 तासांत केरळमध्ये 3,512 लोक आणि त्यानंतर तामिळनाडूमध्ये 473 लोक बरे झाले आहेत.
गेल्या 24 तासांत 98 मृत्यूची नोंद झाली आहे.
नवीन मृत्यूंपैकी 88.78% मृत्यू हे चार राज्यात झाले आहेत. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक 54 मृत्यू झाले आहेत. मागील 24 तासात केरळमध्ये दररोज 16 आणि पंजाबमध्ये 10 मृत्यूची नोंद झाली आहे.
मध्य प्रदेश, दिल्ली, तेलंगणा, आंध्र प्रदेश, राजस्थान, जम्मू-काश्मीर (केंद्र शासित प्रदेश), उत्तराखंड, झारखंड, गोवा, बिहार, पुद्दुचेरी, हिमाचल प्रदेश, आसाम, लक्षद्वीप, मणिपूर, मेघालय, सिक्कीम, दिव आणि दमन, दादरा आणि नगरहवेली, मिझोरम, अरुणाचल प्रदेश, लदाख (केंद्रशासित प्रदेश), त्रिपुरा, नागालँड आणि अंदमान आणि निकोबार बेटे या चोवीस राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये गेल्या 24 तासांत कोविड-19 मुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद नाही.
* * *
Jaydevi PS/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1702192)
Visitor Counter : 278