आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

45 वा दिवस- कोविड19 प्रतिबंधक लसीकरणाच्या पुढील टप्प्याचा प्रारंभ


कोविन पोर्टलवर आज 25 लाख लाभार्थ्यांची नोंदणी, 24.5 लाख सर्वसामान्य लाभार्थी नागरिकांचा समावेश

आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसींच्या 1.47 कोटीपेक्षा जास्त मात्रा देण्यात आल्या

आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत 4.27 लाख लसींच्या मात्रा देण्यात आल्या

Posted On: 01 MAR 2021 10:44PM by PIB Mumbai

 

देशभरात आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड19 प्रतिबंधक लसींच्या मात्रांच्या संख्येने आज 1.47 कोटींचा टप्पा ओलांडला. या देशव्यापी लसीकरण मोहिमेचा प्रारंभ 16 जानेवारी 2021 रोजी झाला होता आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांसाठी (एफएलडब्लू) 2 फेब्रुवारी 2021 पासून लसीकरण सुरू करण्यात आले होते. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आणि  विशिष्ट सहव्याधी असलेल्या 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींसाठी कोविड19 प्रतिबंधक लसीकरणाच्या टप्प्याची आज सुरुवात झाली.

आज कोविन पोर्टलवर 25 लाख लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली. यापैकी 24.5 लाख लाभार्थी सर्वसामान्य नागरिक आहेत तर उर्वरित लाभार्थी आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवरील कर्मचारी आहेत.

आज सर्वसामान्य नागरिकांपैकी 6.44 लाख लाभार्थींनी भेटीची वेळ निश्चित केली. आज मिळालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार संध्याकाळी सात वाजेपर्यंत लसींच्या एकूण 1,47,28,569 मात्रा आतापर्यंत देण्यात आल्या आहेत. यामध्ये लसीची पहिली मात्रा घेणाऱ्या 66,95,665 आरोग्य कर्मचाऱ्यांचा आणि दुसरी मात्रा घेणाऱ्या 25,57,837 आरोग्य कर्मचाऱ्यांचा, लसीची पहिली मात्रा घेणाऱ्या विविध आघाड्यांवरील 53,27,587 कर्मचाऱ्यांचा, 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या 1,28,630 लाभार्थ्यांचा आणि विशिष्ट सहव्याधी असलेल्या 45 वर्षांवरील 18,850 लाभार्थ्यांचा समावेश आहे.

आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत लसीकरणाच्या 45व्या दिवशी लसींच्या 4,27,072 मात्रा देण्यात आल्या. तात्पुरत्या अहवालानुसार यामध्ये लसीची पहिली मात्रा घेणाऱ्या 3,25,485 लाभार्थ्यांचा आणि दुसरी मात्रा घेणाऱ्या 1,01,587 आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश होता. आज रात्री उशिरा अंतिम अहवाल पूर्ण करण्यात येईल.

Date: 1st March, 2021

आरोग्य कर्मचारी

आघाडीवरील कर्मचारी

45 ते 60 वर्षांपर्यंतचे सहव्याधी असलेले

 60 वर्षांवरील

Total Achievement

पहिली मात्रा

दुसरी मात्रा

पहिली मात्रा

पहिली मात्रा

पहिली मात्रा

1st Dose

2nd Dose

25,656

1,01,587

1,52,349

18,850

1,28,630

3,25,485

1,01,587

 ***

S.Tupe/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1701827) Visitor Counter : 225