रसायन आणि खते मंत्रालय

तिसऱ्या जनौषधी दिवस 2021 ला प्रारंभ


1 मार्च ते 7 मार्च 2021 या कालावधीत जनौषधी दिवस सप्ताह साजरा केला जाणार

''सेवा भी - रोजगार भी'' ही तिसऱ्या जनौषधी दिवसाची संकल्पना

आज सुमारे 1000 आरोग्य तपासणी शिबीरांचे आयोजन

Posted On: 01 MAR 2021 8:44PM by PIB Mumbai

 

तिसरा जनऔषधी दिवस 2021 च्या कार्यक्रमाला आजपासून सुरुवात झाली. हा कार्यक्रम 1 मार्च ते  7 मार्च  2021 या दरम्यान आठवडाभर चालणार आहे. देशभरात आज जनौषधी केंद्रांनी आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली होती. विविध जनौषधी केंद्रांनी आयोजित केलेल्या या आरोग्य तपासणी शिबिरांमध्ये रक्तदाब तपासणी, साखर पातळी तपासणी, मोफत डॉक्टरांचा सल्ला, मोफत औषध वितरण इत्यादींचा समावेश होता. देशभरात आज विविध ठिकाणी 1000 हून अधिक आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली होती. या आरोग्य शिबिरांना भेट देणाऱ्या सर्वसामान्य लोकांना जनौषधी केंद्राच्या माध्यमातून विक्री केल्या जाणाऱ्या औषधांचे दर, फायदे आणि दर्जासंदर्भात माहिती देण्यात आली.

प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परियोजना (पीएमबीजेपी) ची अंमलबजावणी करणारी संस्था ब्युरो ऑफ फार्मा पीएसयू ऑफ इंडिया (बीपीपीआय) "सेवा भी - रोजगार भी" या संकल्पनेतून 7 मार्च 2021 रोजी तिसरा जनौषधी दिवस साजरा करीत आहे.

दरवर्षी 7 मार्चला भारतभर "जनौषधी दिवस" ​​साजरा करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. गेल्या वर्षी, दुसऱ्या जनौषधी दिवसाच्या कार्यक्रमात

5695 प्रधानमंत्री भारतीय जनौषधी केंद्रानी सहभाग घेतला होता, यात 15 लाख भारतीय नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवला. देशभरात आरोग्य तपासणी शिबिरे, जनौषधी परिसंवाद, टिच देम यंग, जनौषधी का साथ इत्यादी उपक्रम आयोजित करून 1 मार्च ते 7 मार्च दरम्यान जनौषधी दिवस सप्ताह साजरा होत आहे.

"प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परियोजना" हा भारत सरकारच्या औषधनिर्माण विभागाचा उपक्रम आहे, जो किफायतशीर दरात दर्जेदार औषधे उपलब्ध करून देत जनतेसाठी परिणामकारक ठरत आहे. देशातील सर्व 734 जिल्ह्यांमध्ये दुकानांची संख्या वाढून 7400 हून अधिक झाली आहे.

 

***

S.Tupe/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1701787) Visitor Counter : 319