आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

केरळ, महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरातमध्ये कोविड रुग्णांच्या दैनंदिन संख्येत वाढ कायम

Posted On: 01 MAR 2021 1:02PM by PIB Mumbai

 

देशातील अनेक राज्यांमध्ये कोविड रुग्णांच्या दैनंदिन संख्येत वाढ नोंदली जात आहे.  महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरात या सहा राज्यांमध्ये  गेल्या 24  तासात नवीन रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.

गेल्या 24 तासांत 15,510 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 8,293 रुग्ण आढळले आहेत. त्याखालोखाल  केरळमध्ये 3,254 आणि पंजाबमध्ये 579 नवीन रुग्ण आढळले आहेत.

केंद्र सरकार जिथे सक्रिय रुग्णांची संख्या जास्त आहे आणि दररोज नवीन कोविड रुग्णसंख्येत  वाढ होत आहे अशा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांशी नियमित संपर्क साधत आहे. कोविड19  चा प्रसार रोखण्यासाठी सतत कठोर दक्षता बाळगण्याचा  सल्ला राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आला आहे.

 

 

 

आज भारताची एकूण सक्रिय रुग्णसंख्या 1,68,627 इतकी आहे. भारतातील सध्याच्या सक्रिय रुग्णसंख्येचे प्रमाण  आता भारताच्या एकूण सकारात्मक रुग्णसंख्येच्या 1.52 टक्के आहे. एकट्या  महाराष्ट्रात एकूण सक्रिय रुग्णांपैकी  46.39 टक्के रुग्ण आहेत.

10,000 हून अधिक सक्रिय रुग्ण  असलेली केरळ आणि महाराष्ट्र ही दोन राज्ये आहेत.

आतापर्यंत 2,92,312 सत्राद्वारे लाभार्थ्यांना एकूण 1,43,01,266 लसीच्या मात्रा  देण्यात आल्या आहेत.

लसीकरणासाठी नोंदणी व वेळेबाबत कोणत्याही माहितीसाठी लाभार्थ्यांनी पुढील युझर गाईड अर्थात मार्गदर्शक सूचना पाहाव्यात. :

https://www.mohfw.gov.in/pdf/UserManualCitizenRegistration&AppointmentforVaccination.pdf  

या सर्व खासगी रुग्णालयांची यादी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे. यासाठी पुढील संकेतस्थळांना भेट द्या

a) https://www.mohfw.gov.in/pdf/CGHSEmphospitals.xlsx

b) https://www.mohfw.gov.in/pdf/PMJAYPRIVATEHOSPITALSCONSOLIDATED.xlsx

आतापर्यंत 1.07 कोटी (1,07,86,457) पेक्षा जास्त लोक बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 11,288 रूग्ण बरे झाले आहेत आणि त्यांना घरी सोडले आहे.

महाराष्ट्रात काल सर्वाधिक 62 मृत्यूंची नोंद झाली.

M.Chopade/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1701656) Visitor Counter : 256