गृह मंत्रालय
भारत आणि बांगलादेश दरम्यान गृहसचिव स्तरावरील चर्चेची 19 वी फेरी
Posted On:
27 FEB 2021 5:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी 2021
‘मुजीब वर्ष’ तथा बांगलादेश मुक्ति संग्रामाला तसेच उभय देशांमधील परराष्ट्र विषयक संबंध प्रस्थापित होऊन 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज भारत आणि बांगलादेश दरम्यान गृहसचिव स्तरावरील चर्चेची 19 वी फेरी (एचएसएलटी) आभासी पद्धतीने पार पडली. यावेळी भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांनी केले तर बांगलादेशच्या गृह व्यवहार मंत्रालयाच्या जन सुरक्षा विभागातील वरिष्ठ सचिव मुस्तफा कमल उददिन यांनी बांगलादेशच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले.
भारत आणि बांगलादेश त्यांच्या द्विपक्षीय संबंधांना सर्वाधिक महत्त्व देतात. दोन्ही सचिवांनी सुरक्षा आणि सीमा संबंधित मुद्द्यांमध्ये परस्पर सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्याच्या आणि मजबूत करण्याच्या प्रतिबद्धतेचा यावेळी पुनरुच्चार केला. उभय देशातील कोणत्याही क्षेत्राचा वापर हा दोन्ही देशांना हानिकारक असलेल्या कोणत्याही कामासाठी केला जाणार नाही याला दुजोरा दिला.
बनावट भारतीय चलनी नोटा (एफआयसीएन) आणि प्रतिबंधित वस्तूंच्या तस्करीला आळा घालण्यासाठी सहकार्याच्या पातळीत आणखी वाढ करण्याचे दोन्ही बाजूंनी मान्य केले.
विविध सुरक्षा संस्थांसाठी प्रशिक्षण आणि क्षमता वाढविण्याच्या क्षेत्रात भारताने केलेल्या सहकार्याचे यावेळी बांगलादेशने कौतुक केले.
* * *
S.Tupe/S.Mahtre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1701361)
Visitor Counter : 229