भारतीय स्पर्धा आयोग

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या हस्ते चेन्नई येथे भारतीय स्पर्धा आयोगाच्या दक्षिण क्षेत्रीय कार्यालयाचे उद्‌घाटन

Posted On: 26 FEB 2021 3:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी 2021

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज चेन्नई येथे भारतीय स्पर्धा आयोगाच्या क्षेत्रीय कार्यालयाचे (दक्षिण) उद्‌घाटन आभासी माध्यमातून केंद्रीय अर्थ व कंपनी व्यवहार राज्यमंत्री अनुरागसिंग ठाकूर यांच्या उपस्थितीत केले.

सीसीआयचे चेन्नई कार्यालय हे दिल्ली कार्यालयाशी समन्वय साधून अंमलबजावणी, तपास, वकिली कार्य सुलभ करण्यासाठीचे कार्यालय म्हणून काम करेल. हे क्षेत्रीय कार्यालय तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी आणि लक्षद्विप यांच्या कामासंदर्भातील गरजा पूर्ण करेल.

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सीसीआयने घेतलेल्या कष्टांबाबत समाधान व्यक्त केले आणि आर्थिक वाढ आणि विकासाच्या प्रयत्नात सहकार्य असण्याची गरज व्यक्त केली. सीसीआयचे सचिव यांनी आभार प्रदर्शन केले, अर्थमंत्री, अर्थराज्यमंत्री आणि एमसीए सचिव यांच्या प्रति त्यांनी विशेष कृतज्ञता व्यक्त केली.

S.Thakur/S.Shaikh/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1701069) Visitor Counter : 252