वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

पियुष गोयल यांनी औषध निर्मिती आणि वैद्यकीय उपकरणे क्षेत्रावरील 6 व्या आंतरराष्ट्रीय परिषदेला संबोधित केले

Posted On: 25 FEB 2021 6:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 फेब्रुवारी 2021


रेल्वे, वाणिज्य आणि उद्योग मंत्री आणि ग्राहक व्यवहार व अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांनी आज भारतीय औषध निर्मिती आणि आरोग्य सेवा क्षेत्राला गुणवत्ता, सुविधा आणि उच्च दर्जा राखण्याप्रति बांधिलकीच्या बाबतीत  उत्तम पध्दतींचा अवलंब करण्याचे आवाहन केले. औषध निर्मिती आणि वैद्यकीय उपकरणे क्षेत्रावरील  6 व्या आंतरराष्ट्रीय परिषदेला संबोधित  करताना ते म्हणाले की, देशात चांगल्या उत्पादन पद्धती असतील हे आपण  सर्वांनी एकत्रितपणे सुनिश्चित करायला हवे. संपूर्ण आरोग्य परिसंस्थेने जगाला आत्मविश्वास द्यायला हवा की आरोग्याशी संबंधित कोणत्याही गोष्टीसाठी आणि उपायांसाठी भारत ही एकमेव जागा आहे. 

ते  म्हणाले की, गेल्या काही वर्षांमध्ये भारताने आरोग्यसेवांसाठी एक सुवर्णकाळ पाहिला आहे. आपण पुढचे दशक  भारताचे दशक बनवले पाहिजे ज्यात संपूर्ण जग भारतीय मानकांचे पालन करेल.

ते  म्हणाले की आज जगाला रोगमुक्त होण्याची गरज आहे. संशोधन आणि नव उद्योगातून किफायतशीर सार्वत्रिक उपायाद्वारे रोगमुक्त होता येईल. 

गोयल म्हणाले की, जास्तीत जास्त देशांना समप्रमाणात औषधे मिळावी यासाठी सवलत मिळावी म्हणून टीआरआयपीएस परिषदेत डब्ल्यूटीओसमोर ऑक्टोबर 2020 मध्ये मांडण्यात आलेल्या प्रस्तावात दक्षिण आफ्रिकेसह भारत आघाडीवर आहे. 

ते म्हणाले की भारत कोविड महामारीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे आणि औषध निर्मिती उद्योग कोविड महामारीतून विकासाच्या मार्गावर आहे. ते म्हणाले की औषध निर्मिती  उद्योगाने 3 व्ही प्रदान केले आहेत: - व्हेंटिलेटर - लस (व्हॅक्सिन ) - व्ही आकाराची  सुधारणा 

 

* * *

M.Chopade/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1700833) Visitor Counter : 172