कंपनी व्यवहार मंत्रालय
गुंतवणूक करण्यापूर्वी निधी कंपन्यांची स्थिती पडताळून पाहण्याचा कंपनी व्यवहार मंत्रालयाचा गुंतवणूकदारांना सल्ला
Posted On:
25 FEB 2021 2:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी 2021
सुधारित कंपनी कायदा 2013 आणि निधी नियम 2014 अंतर्गत,निधी कंपन्यांनी (ज्या कंपनी कायदा 1956 अंतर्गत ज्या कंपन्या निधी कंपन्या म्हणून जाहीर झाल्या आहेत) किंवा निधी कंपनी म्हणून जाहीर झाल्या आहेत( 01.04.2014 नंतर निधी कंपनी म्हणून स्थापन झालेल्या ) कंपन्यांनी एनडीएच – 4 प्रपत्राद्वारे कंपनी व्यवहार मंत्रालयाकडे अर्ज करून स्वतःला अपडेट करणे आवश्यक आहे.
एनडीएच – 4 प्रपत्रातल्या या अर्जांची तपासणी करताना, या कंपन्यांनी नियमांमधल्या तरतुदींचे संपूर्णपणे पालन केलेले नाही असे केंद्र सरकारच्या लक्षात आले आहे. निधी कंपनी म्हणून जाहीर करण्यासाठी या कंपन्या योग्य नसल्याचे आढळून आल्याने या कंपन्यांचे अर्ज फेटाळण्यात येत आहेत.
गुंतवणूकदारानी,निधी कंपन्यांचा सदस्य होण्यापूर्वी आणि आपली कष्टाची कमाई यामध्ये गुंतवण्यापूर्वी, त्यांचा पूर्वेतिहास आणि स्थिती, विशेष करून, केंद्र सरकारकडून या कंपन्यांना निधी कंपनी म्हणून दर्जा देण्याची केलेली घोषणा पडताळून पहावी असा सल्ला गुंतवणुकदाराना देण्यात आला आहे.
* * *
M.Chopade/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1700737)
Visitor Counter : 203