गृह मंत्रालय
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त कोलकात्याच्या राष्ट्रीय वाचनालयात आयोजित विशेष कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची उपस्थिती
Posted On:
19 FEB 2021 8:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी 2021
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त कोलकात्याच्या राष्ट्रीय वाचनालयात आयोजित विशेष कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपस्थिती लावली.
यावेळी अमित शाह यांनी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या बंगालच्या थोर स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन केले. तसेच बंगालमधील क्रांतिकारकांचे कार्य, धैर्य आणि अतुल्य पराक्रमांची गाथा सांगणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटनही यावेळी त्यांच्या हस्ते झाले.
यावेळी स्वातंत्र्यलढ्यातील महत्वाच्या ऐतिहासिक घटनांवर आधारित एक सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आला. तसेच शाह यांनी सायकल रैलीलाही हिरवा झेंडा दाखवला. या सायकल रैलीत तीन चमू, नेताजी सुभाषचंद्र बोस, रासबिहारी बोस आणि खुदीराम बोस चमू सहभागी झाल्या आहेत. हे सायकलपटू बंगालच्या विविध भागात जाऊन या क्रांतिकारकांच्या कार्याची आणि त्यांनी केलेल्या बलिदानांची गौरवगाथा लोकांसमोर मांडतील.
संस्कृती आणि पर्यटन मंत्री प्रल्हाद सिंह पटेल, पर्यावरण, वने आणि हवामान बदल राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
* * *
M.Chopade/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1699492)
Visitor Counter : 239