आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

सार्वत्रिक लसीकरणावर लक्ष केंद्रित : डॉ हर्ष वर्धन यांनी मिशन इंद्रधनुष 3.0चा केला प्रारंभ

Posted On: 19 FEB 2021 6:47PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 फेब्रुवारी 2021


केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी आज मिशन इंद्रधनुष  3.0 चा प्रारंभ केला. यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी आयएमआय 3.0 पोर्टल देखील सुरू केले आणि आयएमआय 3.0 साठी मार्गदर्शक तत्वे जारी केली  तसेच अभियानाचा  एक भाग म्हणून विकसित केलेल्या जागरूकता साहित्य / आयईसी पॅकेजचे प्रकाशन केले.

प्रत्येक आई व मुलाच्या लसीकरणासाठी करण्यात आलेल्या तयारीबद्दल  डॉ. हर्ष वर्धन यांनी समाधान व्यक्त केले  मिशन इंद्रधनुष अभियानाच्या दोन फेऱ्या 22 फेब्रुवारी आणि 22 मार्च  2021  पासून सुरू होतील आणि देशातील 29 राज्ये / केंद्रशासित प्रदेशातील निवडक 250 जिल्हे / शहरी भागात त्यांचे आयोजन केले जाईल. कोविड 19  महामारीच्या काळात ज्या मुले आणि गर्भवती स्त्रियाना लस घेता आली नाही त्यांच्या लसीकरणावर मिशन इंद्रधनुष  3.0 मध्ये भर दिला जाणार आहे. आयएमआय 3.0 च्या दोन फेऱ्यांमध्ये  त्यांची ओळख पटवली जाईल आणि त्यांना लस  दिली जाईल. प्रत्येक फेरी प्रत्येकी 15 दिवसांसाठी असेल. स्थलांतरित क्षेत्रातील लाभार्थी आणि पोहोचण्यास कठीण अशा दुर्गम भागाकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे कारण कोविड काळात त्यांचे लसीचे डोस चुकले असतील.

डॉ. हर्ष वर्धन यांनी नमूद केले की  अभियानाच्या यापूर्वीच्या यशाच्या आधारे आयएमआय 3.0 अभियान राबवले जाईल  आणि सार्वत्रिक लसीकरणाच्या दिशेने  कायमस्वरूपी प्रयत्न केले जातील.  “मिशन इंद्रधनुष अंतर्गत  आतापर्यन्त 690  जिल्ह्यांमध्ये राबवण्यात आले आणि 3 कोटी 76 लाख 40 हजार मुले आणि 94 लाख 60 हजार गर्भवती महिलांचे  लसीकरण करण्यात आले आहे.

* * *

M.Chopade/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1699465) Visitor Counter : 306