पंतप्रधान कार्यालय
भारत-ऑस्ट्रेलिया चक्राकार अर्थव्यवस्था हॅकेथॉन (आय-एसीई)च्या समारोप समारंभात पंतप्रधानांचे भाषण
Posted On:
19 FEB 2021 1:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी 2021
मित्रहो,
गेल्या वर्षी जूनमध्ये पंतप्रधान मॉरिसन आणि मी चक्रीय अर्थव्यवस्थेवर हॅकेथोन आयोजित करण्याच्या शक्यतेबाबत चर्चा केली.
आमची कल्पना इतक्या लवकर साकार झाली याचा मला आनंद आहे.
या संयुक्त उपक्रमाला पाठिंबा दिल्याबद्दल मी माझे प्रिय मित्र, पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांचे आभार मानतो.
कोविड -19 महामारी असूनही सहभागी झालेल्या सर्वांच्या वचनबद्धतेचे देखील मी कौतुक करतो.
माझ्यासाठी तुम्ही सर्व विजेते आहात.
मित्रहो,
मानवजातीला हवामान बदलाद्वारे उद्भवलेल्या आव्हानांचा सामना करावा लागत असताना, या हॅकेथॉनची संकल्पना संपूर्ण जगासाठी प्रासंगिक आहे.
उपभोगाभिमुख आर्थिक मॉडेल्सनी आपल्या वसुंधरेवर मोठा ताण आणला आहे.
आपण हे कधीही विसरू नये की, वसुंधरा आपल्याला देत असलेल्या संसाधनांचे आपण मालक नव्हे, तर सर्व भावी पिढ्यांसाठी तिचे केवळ विश्वस्त आहोत.
आपल्या उत्पादन प्रक्रिया अधिक कार्यक्षम आणि कमी प्रदूषणकारक करणे पुरेसे नाही.
एखादी व्यक्ती गाडी किती वेगाने किंवा हळू चालवते याने काही फरक पडत नाही, जर दिशा चुकीची असेल तर ती व्यक्ती चुकीच्या गंतव्यस्थानीच पोहोचेल.
आणि म्हणूनच आपण योग्य दिशा निश्चित केली पाहिजे.
आपण आपल्या उपभोगाच्या पद्धतीकडे आणि आपण त्यांचा पर्यावरणावर होणार प्रभाव कसा कमी करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे.
येथेच चक्राकार अर्थव्यवस्थेची संकल्पना अभिप्रेत आहे.
आपली अनेक आव्हाने सोडवण्यात ही एक महत्त्वाची पायरी असू शकते.
वस्तूंचे रिसायकलिंग आणि पुनर्वापर करणे, अपव्यय टाळणे आणि संसाधनाची कार्यक्षमता सुधारणे हा आपल्या जीवनशैलीचा भाग बनायला हवा.
या हॅकेथॉनमध्ये भारतीय आणि ऑस्ट्रेलियन विद्यार्थी, स्टार्टअप्स आणि उद्योजकांकडून नाविन्यपूर्ण संशोधने पाहायला मिळाली आहेत.
हे नवसंशोधन चक्राकार अर्थव्यवस्थेच्या तत्वज्ञानाप्रति तुमची वचनबद्धता दाखवते.
तुमच्या नवोन्मेशी कल्पनांमुळे, आपल्या दोन देशांना चक्राकार अर्थव्यवस्थेबाबत आघाडीची भूमिका घेण्यासाठी या दोन देशांना प्रेरणा मिळेल यात मला तसूभरही शंका नाही.
आणि त्यासाठी आता आपण या कल्पनांची व्याप्ती वाढवण्याचे आणि प्रत्यक्षात आणण्याचे मार्ग देखील शोधले पाहिजेत.
मित्रहो,
मोकळेपणाने नवीन कल्पना आणि नवसंशोधन हाताळणे आणि जोखीम घेण्याची क्षमता यातून युवकांचे सामर्थ्य निर्माण होते.
आजच्या युवा सहभागींची उर्जा आणि उत्साह, भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या भविष्यातल्या भागीदारीचे प्रतीक आहे.
आपल्या युवकांची उर्जा, सर्जनशीलता आणि चाकोरीबाहेर विचार करण्यावर माझा पूर्ण विश्वास आहे.
केवळ आपल्या दोन देशांनाच नाही तर संपूर्ण जगाला ते शाश्वत, समग्र उपाय देऊ शकतात.
कोविड पश्चात जगाला आकार देण्यात भारत-ऑस्ट्रेलियाची मजबूत भागीदारी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.
आणि आपले युवक, आपले तरुण नवोन्मेषक, आपले स्टार्टअप्स या भागीदारीत आघाडीवर असतील.
धन्यवाद!
खूप खूप धन्यवाद!
* * *
S.Tupe/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1699334)
Visitor Counter : 237
Read this release in:
Assamese
,
Telugu
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam