रेल्वे मंत्रालय
पश्चिम बंगालमधील विविध रेल्वे पायाभूत प्रकल्पांचे पीयूष गोयल यांच्या हस्ते लोकार्पण
Posted On:
17 FEB 2021 7:03PM by PIB Mumbai
रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आज नवीन विद्युतीकरण केलेला मणिग्राम-निमतीत विभाग, मालदा आणि मनिग्राम जवळील पूल (आरयूबी), खगराघाट रोड, लालबाग कोर्ट रोड, तेन्या, दहापरधाम आणि नियालिशपारा येथील पाच फूट ओव्हर ब्रिज, सुजनीपारा व बासुदेवपूर स्थानकांवरील दोन फूट ओव्हर ब्रिजचे व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकार्पण केले. पूर्व रेल्वे मालदा विभागांतर्गत वरील कामे करण्यात आली. गोयल यांनी नव्याने विद्युतीकरण केलेल्या मनिग्राम-निमतीत विभागावर मालगाडीला हिरवा झेंडा देखील दाखविला. यावेळी पर्यावरण, वन व हवामान बदल राज्यमंत्री बाबुल सुप्रियो आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
2023 पर्यंत पश्चिम बंगालमधील प्रत्येक मार्गाचे विद्युतीकरण होईल, यामुळे प्रदूषण कमी होईल, वेग वाढेल आणि प्रवाशांच्या सुविधा वाढतील असे पीयूष गोयल यांनी यावेळी सांगितले. पश्चिम बंगालमधील रेल्वेच्या पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी मागील सहा 19,811 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. कोणत्याही रेल्वे अपघातात एकाही प्रवाशाने आपला प्राण गमावला नाही, रेल्वे कर्मचार्यांच्या मेहनतीचे हे फळ असून भारतीय रेल्वेने सुरक्षिततेचा नवीन विक्रम नोंदविला आहे असेही गोयल यांनी यावेळी नमूद केले.
***
M.Chopade/S.Mhatre/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1698810)
Visitor Counter : 220